शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur: मराठा आंदोलनाचे ‘हॉट स्पॉट’ कुठे? तपास यंत्रणा लागल्या कामाला

By नरेश डोंगरे | Updated: October 28, 2023 19:33 IST

Nagpur News: आरक्षणाच्या (Maratha Reservation ) मुद्द्यावरून राज्यात आंदोलनाचे रान पेटले आहे. त्याची धग राज्याच्या कोणकोणत्या भागात पोहोचू शकते, ते तपासण्यासाठी तपास यंत्रणा कामाला लागल्या आहेत.

- नरेश डोंगरेनागपूर : आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात आंदोलनाचे रान पेटले आहे. त्याची धग राज्याच्या कोणकोणत्या भागात पोहोचू शकते, ते तपासण्यासाठी तपास यंत्रणा कामाला लागल्या आहेत. या आंदोलनाच्या आडून कुण्या समाजकंटकांनी डाव साधू नये म्हणून अत्यंत गोपनीय पद्धतीने ठिकठिकाणच्या उपद्रवींची माहिती काढली जात आहे. यासोबतच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरील आंदोलनाची तीव्रता कुठे कुठे राहील, अर्थात आंदोलनाचे ‘हॉट स्पॉट’ कुठे राहू शकतात, त्याचीही माहिती काढली जात आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक झाल्यामुळे सध्या राज्यभरात आंदोलनाची धार वाढताना दिसत आहे. ठिकठिकाणी ‘हायव्होल्टेज ड्रामा’ बघायला मिळत आहे. नेत्यांना घेराव, कार्यक्रमात घोषणाबाजी, बैठका उधळून लावण्याचे तसेच जाब विचारण्याचे प्रकार सुरू असून, अनेक जिल्ह्यांमध्ये राजकीय नेत्यांना गावबंदीही करण्यात आली आहे. ठिकठिकाणी मंत्री आणि नेत्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

तूर्त हे सर्व प्रकार पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात होत असले तरी रोषाचा हा वणवा लवकर राज्यातील इतर भागातही पोहोचू शकतो, अशी खात्री तपास यंत्रणांना पटली आहे. त्यामुळे आंदोलनाची तीव्रता कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या भागात जास्त राहील, आंदोलनाचे ‘हॉट स्पॉट’ कुठे राहू शकतात. त्याठिकाणी कोणत्या उपाययोजना करायच्या, आंदोलनाची तीव्रता कशी कमी करायची, या संबंधाने अत्यंत गोपनीय पद्धतीने तपास यंत्रणा वर्कआऊट करत आहेत. या पार्श्वभूमीवर, ठिकठिकाणच्या खबऱ्यांची मदत घेऊन उपद्रवी वृत्तीच्या व्यक्तींची यादीही तयार केली जात आहे. या आंदोलनाच्या आडून आपले कलुषित मनसुबे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांवरही नजर ठेवली जात आहे.

विदर्भातील तीव्रता अधोरेखितखास सूत्रांच्या माहितीनुसार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन तीव्र झाले तरी विदर्भातील अनेक जिल्ह्यांत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न फारसा गंभीर होणार नाही. तथापि, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, अमरावतीसह अन्य काही जिल्ह्यांत तीव्र स्वरूपाचे आंदोलन होणार असल्याचे सांगितले जाते. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार