शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

मराठा आंदोलनाचा एसटीने घेतला धसका, रेल्वे पोलीसही अलर्ट मोडवर; विदर्भातील अनेक गाड्या मराठवाड्यात अडकून 

By नरेश डोंगरे | Updated: February 17, 2024 23:19 IST

आज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. त्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी, खास करून मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वाहतूक रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे.

नागपूर : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाची धग राज्य परिवहन महामंडळाला बसली आहे. संतप्त आंदोलकांकडून जाळपोळ, दगडफेक आणि रस्ता रोको होत असल्याने एसटी महामंडळाने चांगलाच धसका घेतला आहे. या पार्श्वभूमीवर, विदर्भातील गाड्या तिकडे अडकून पडल्यामुळे ठिकठिकाणाहून मराठवाड्यात जाणाऱ्या एसटीच्या फेऱ्या थांबविण्यात आल्या आहेत.

आज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. त्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी, खास करून मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वाहतूक रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. संतप्त आंदोलकांनी आपला रोष एसटी महामंडळावर काढला आहे. बस पेटविणे, दगडफेक करणे, रस्त्यात टायर जाळणे असे प्रकार घडत असल्याने एसटीचे विदर्भातील अनेक विभाग चांगलेच दडपणात आले आहे. माहूर, औरंगाबाद, परभणी, बीड, जालना, नांदेड, किनवटकडे जाणाऱ्या गाड्या अडविण्यात आल्या आहेत. त्या परत ईकडच्या मार्गावर टाकल्यास जाळपोट, तोडफोड होऊ शकते, हे लक्षात आल्याने एसटीच्या अधिकाऱ्यांनी या गाड्या नजिकच्या (तिकडच्या) आगारात सुरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विदर्भातील अनेक गाड्या तिकडे अडकून पडल्या आहेत. एकट्या नागपुरातील १२ गाड्या २४ तासांपासून मराठवाड्यातील वेगवेगळ्या गावात अडकून पडल्या आहेत. आणखी गाड्या पाठविल्यास त्यादेखिल तिकडे अडकून पडण्याची भीती निर्माण झाल्याने एसटीच्या अधिकाऱ्यांनी माहूर, औरंगाबाद, परभणी, बीड, जालना, नांदेड, किनवटकडे जाणाऱ्या फेऱ्या, ज्या ठिकाणी आंदोलनाचे लोण नाही, अशा सुरक्षित गावांपर्यंतच पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून एसटीच्या अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणच्या पोलिसांना पत्र देऊन आंदोलनाची धग बसू नये म्हणून मोठ्या शहरातील बस स्थानकांवर सुरक्षेसाठी पोलीस तैनात करण्याची विनंती वजा मागणी केली आहे.

गस्त वाढवा, सतर्क रहा !मराठा आंदोलनाचा फटका बसू नये म्हणून लोहमार्ग पोलिसांनाही खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आदेश शिर्षस्थ पातळीवरून देण्यात आले आहे. बंदोबस्त वाढवा, प्रत्येक रेल्वे गाडीवर लक्ष ठेवा, २४ तास अलर्ट रहा आणि रेल्वे लाईन, फलाटावरची गस्त वाढवा, असे आदेश आज मुख्यालयातून जारी करण्यात आले आहे. त्यानुसार, येथील रेल्वे स्थानकावरचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. डॉग स्कॉड सज्ज ठेवून गस्तही वाढविण्यात आली आहे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणVidarbhaविदर्भMarathwadaमराठवाडा