शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

राज्यघटनेचे प्रास्ताविक हाच रिपब्लिकन चळवळीचा जाहीरनामा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 11:22 PM

रिपब्लिकन चळवळ ही केवळ राजकारणापुरती मर्यादित नाही. मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करणारी ती चळवळ आहे. राज्यघटनेचे प्रास्ताविक हाच रिपब्लिकन चळवळीचा जाहीरनामा आहे आणि त्यासाठी दिवंगत उमाकांत रामटेके आणि असंख्य नेते व कार्यकर्ते हे जीवनभर कार्यरत होते आणि असतात, असे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. जोगेंद्र कवाडे यांनी येथे कले.

ठळक मुद्देजोगेंद्र कवाडे : दिवंगत उमाकांत रामटेके यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रिपब्लिकन चळवळ ही केवळ राजकारणापुरती मर्यादित नाही. मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करणारी ती चळवळ आहे. राज्यघटनेचे प्रास्ताविक हाच रिपब्लिकन चळवळीचा जाहीरनामा आहे आणि त्यासाठी दिवंगत उमाकांत रामटेके आणि असंख्य नेते व कार्यकर्ते हे जीवनभर कार्यरत होते आणि असतात, असे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. जोगेंद्र कवाडे यांनी येथे कले.आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते दिवंगत उमाकांत रामटेके यांना सोमवारी सर्वपक्षीय जाहीर श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. हिंदी मोरभवन सीताबर्डी येथील मधुरम सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. अशोक गोडघाटे होते. तर गिरीश गांधी, गिरीश पांडव, रिपाइं(आ.)चे प्रदेशाध्यक्ष भूपेश थूलकर, अरुण वनकर, शिवसेनेचे शेखर सावरबांधे, मनसेचे हेमंत गडकरी, प्रभाताई रामटेके प्रमुख अतिथी होते.प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले, राज्यघटनेचे फळ हे या देशातील १३० कोटी लोकांना कसे मिळतील, हा रिपब्लिकन चळवळीचा ध्यास होता आणि आहे. त्यासाठी रिपब्लिकन चळवळीतील प्रत्येक कार्यकर्ता हा काम करीत असतो. मग त्याच्यासोबत कुणी आला तर ठीक, नाही तर तो एकटाच प्रामाणिकपणे कार्यरत असतो. दिवंगत उमाकांत रामटेके यांनीसुद्धा आयुष्यभर आंबेडकरी चळवळीला अशाच प्रकारे मजबूत करण्याचे कार्य केले.अशोक गोडघाटे, गिरीश गांधी, गिरीश पांडव, भूपेश थूलकर, अरुण वनकर, हरिदास टेंभुर्णे, हेमंत गडकरी, शंकर माणके, राजन वाघमारे, प्रकाश कुंभे, घनश्याम फुसे, दिनेश गोडघाटे, अरुण गजभिये, सेवक गजभिये, सिद्धार्थ पाटील आदींनीही आपले विचार व्यक्त करीत दिवंगत उमाकांत रामटेके यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.प्रास्ताविक राजू बहादुरे यांनी केले. संचालन अमृत गजभिये यांनी केले. सुधाकर टवळे यांनी आभार मानले.रिपाइंचे ऐक्य व्हावेयावेळी उपस्थित वक्त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या ताकदीवर प्रकाश टाकत रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली. दिवंगत उमाकांत रामटेके यांनी आयुष्यभर रिपाइंच्या ऐक्यासाठी प्रयत्न केले. रिपाइंचे ऐक्य होणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असेही यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :nagpurनागपूर