नागपुरात आंब्याचे भाव घसरल्याने खवय्यांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 22:54 IST2020-05-29T22:52:31+5:302020-05-29T22:54:08+5:30
कळमना ठोक बाजारात आंब्याची आवक वाढल्याने किरकोळमध्ये दर घसरले असून सर्वाधिक विकणारे बैगनफल्ली आंबे ६० रुपये किलो आहेत. दर घसरल्याने खवय्यांना दिलासा मिळाला आहे.

नागपुरात आंब्याचे भाव घसरल्याने खवय्यांना दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कळमना ठोक बाजारात आंब्याची आवक वाढल्याने किरकोळमध्ये दर घसरले असून सर्वाधिक विकणारे बैगनफल्ली आंबे ६० रुपये किलो आहेत. दर घसरल्याने खवय्यांना दिलासा मिळाला आहे.
आंध्र प्रदेशातून सर्वाधिक आवकीचे बैगनफल्ली आंब्याचे भाव किरकोळमध्ये मे महिन्याच्या प्रारंभी १०० ते १२० रुपये होते. आवक वाढताच भाव ८० रुपये तर आता ६० रुपये किलोपर्यंत खाली आले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक कुटुंबाने फळ विक्रीचा व्यवसाय सुरू केला. घरपोच सेवा सुरू केली आहे. शिवाय शहरात सर्वत्र रस्त्याच्या कडेला स्टॉल उभारून आंब्याची विक्री वाढली आहे. आंध्र प्रदेशचा हापूस १०० रुपये, केशर ८० रुपये किलो भाव आहेत. यावर्षी नागपूर जिल्ह्यात आंब्याचे उत्पादन केवळ ५ ते १० टक्के आले आहे. गावरानी आंब्याची थोडीफार आवक सुरू आहे. यंदा रोगराईमुळे सिझनमध्ये पूर्वी चांगल्या दर्जाच्या आंब्याची आवक कमीच होती. पण आता सर्व ठिकाणांहून आवक वाढल्याने दरही घसरले आहेत. यावर्षी लॉकडाऊनमुळे कोकणातील हापूस आंबा नागपूरकांना चाखायला मिळाला नाही. थोडीफार आवक झाली, पण ५०० ते ७०० रुपये डझन भाव असल्याने ग्राहकांनी पाठ फिरविली. गरीब व सामान्यांच्या आवाक्यातील बैगनफल्ली आंब्यालाच जास्त मागणी आहे. जूनमध्ये पावसाचे आगमन झाल्यानंतर आंब्याची आवक आणि विक्री कमी होणार आहे. त्यामुळे सिझनच्या अखेरीस नागरिकांनी आंब्याची खरेदी करावी, असे आवाहन विक्रेत्यांनी केले आहे.