आंबा झाला स्वस्त!

By Admin | Updated: June 5, 2014 01:08 IST2014-06-05T01:08:30+5:302014-06-05T01:08:30+5:30

फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा गेल्या चार वर्षांंंंत पहिल्यांदाच सामान्यांच्या आवाक्यात आला आहे. आंबा स्वस्तात मस्त उपलब्ध झाल्याने खवय्यांची चंगळ सुरू आहे.

Mango becomes cheap! | आंबा झाला स्वस्त!

आंबा झाला स्वस्त!

कळमन्यात आवक वाढली : चौकाचौकात विक्री
नागपूर : फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा गेल्या चार वर्षांंंंत पहिल्यांदाच सामान्यांच्या आवाक्यात आला आहे. आंबा स्वस्तात मस्त  उपलब्ध झाल्याने खवय्यांची चंगळ सुरू आहे. सर्वच स्तरातून आंबा खरेदीकडे ओढा वाढत चालला आहे. चौकांमध्ये सर्वत्रच आंब्याची विक्री होत  असल्याचे चित्र आहे.
आंब्यांचे दर चांगलेच गडगडल्याने सामान्यांना चांगल्या प्रतिच्या आंब्यांची चवही चाखता येणे शक्य झाले आहे. बैंगनफल्ली किरकोळमध्ये आंबा  ३0 रुपये किलो आहे. पण उत्पादक शेतकरी मात्र आंब्याला उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी भाव मिळू लागल्याने अडचणीत आले आहेत. यंदा हापूस  आंब्याच्या परदेशी वारीवर प्रतिबंध लागल्याने काही दिवसांआधी कळमन्यात चार डझन हापूसची पेटी १000 ते १२00 रुपयात होती. आता ४00  रुपये डझन असा दर आहे. सर्वसाधारणपणे नागपुरात सर्वाधिक विकणारा बैंगनफल्ली आंबा दरवर्षी किरकोळमध्ये ५0 रुपये किलोखाली मिळत नाही.  पण यंदा किमती २0 रुपयांपर्यंंंंत खाली आल्या होत्या.
कळमना फ्रूट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आनंद डोंगरे यांनी सांगितले की, मध्यंतरी भाव कमी झाल्यानंतरही ग्राहकांकडून मागणी नव्हती. त्यामुळे दर  प्रति किलो २0 रुपयांपर्यंंंंत खाली आले होते. लहानांपासून मोठय़ापर्यंंंंत सर्वांंंंनाच आंब्याची चव चाखण्याची इच्छा असते. हल्ली संकरित जातीमुळे  वर्षभर आंबे बाजारात दिसत असले तरी या मोसमात आंबे खाण्याची लज्जत काही औरच असते. सुरुवातीला आवक कमी असते. मागणीही फारशी  नसते. नंतर मात्र आवकही वाढते आणि मागणीदेखील वाढतच जाते. त्यामुळे आंब्याची बाजारपेठ चांगलीच फुलते. बाजारपेठेत इतर आंब्यासहित  हापूस आंबादेखील आहे. खवय्यांना यावर्षी स्वस्तात आंब्याची गोडी चाखण्याची पर्वणीच मिळाली आहे. (प्रतिनिधी)
दररोज सुरू आहे                   १२५ ट्रकची आवक
आनंद डोंगरे यांनी सांगितले की, सध्या कळमना बाजारात आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून दररोज १२५ ट्रकची (५ ते १0 टन) आवक आहे.  होलसेलमध्ये आंबा दर्जानुसार १५ ते २५ रुपये किलो आहे. हापूस ४00 ते ५00 रुपये डझन आहे. गुजरातच्या नवसारी येथून दररोज केसर आंब्याचे  चार ते पाच ट्रक येत आहेत. १0 किलोला २५0 ते ३५0 रुपये दर आहे. स्थानिक केसर आंब्याचे दर १0 ते १५ रुपये किलो आहे. यावर्षी लंगडा दशेरी  आंब्याची आवक अर्धीच आहे. स्थानिकांचा माल येत आहे. गुणवत्ता पाहून दर आहे. कळमन्यातून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि नेपाळच्या सीमेपर्यंंंंत  माल जातो. यंदा पाऊस लांबल्याने १५ जूनपर्यंंंंत आंब्याची भरपूर आवक राहील.
 

Web Title: Mango becomes cheap!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.