काटोलच्या शिरपेचात मानाचा तुरा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:11 IST2021-05-05T04:11:47+5:302021-05-05T04:11:47+5:30
काटोल : काटोल पंचायत समितीमधील उपक्रमशील शिक्षक मारुती मुरके निर्मित व काटोल येथील युवा कलावंत नितीन काळबांडे दिग्दर्शित गोवारी ...

काटोलच्या शिरपेचात मानाचा तुरा...
काटोल : काटोल पंचायत समितीमधील उपक्रमशील शिक्षक मारुती मुरके निर्मित व काटोल येथील युवा कलावंत नितीन काळबांडे दिग्दर्शित गोवारी समाजाची वास्तविकता, शैक्षणिक व सामाजिक परिस्थिती दर्शविणारा माहितीपट ‘स्वल्पविराम’ची दादासाहेब फाळके ११व्या फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झाली होती. शुक्रवारी (दि. ३० एप्रिलला) या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यात ‘स्वल्पविराम’ला ‘बेस्ट एडिटिंग पुरस्कार’ जाहीर करण्यात आला. विशेष म्हणजे या फेस्टिवलमध्ये कुवेत, अमेरिका, इंग्लड, पाकिस्तान, स्वीडन, कझाकिस्तान आदी देशातील डॉक्युमेन्टरी फिल्मचादेखील सहभाग होता. गत तीन वर्षांपासून ‘स्वल्पविराम’ची टीम आदिवासी गोवारी बहुमूलक गावाला भेटी देऊन तेथे प्रत्यक्षात माहितीपटाचे चित्रीकरण करीत होती. तसेच कुठलाही दिखाऊपणा न करता समाजाची वास्तविकता या लघुपटात प्रतिबिंबीत करण्यात आलेली आहे. गोवारी समाजात नैसर्गिकरित्या असणारी साधी राहणीमान व जीवन जगण्याचा दैनंदिन संघर्ष चित्रीकरणात उतरल्यामुळे निवड समितीला लघुपट भावला. स्वल्पविराम चमूने ‘आदिवासी शहीद गोवारी’ बांधवांना हा पुरस्कार समर्पित केला आहे. काटोलच्या युवकांनी चित्रपटासारख्या क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर घेतलेली झेप काटोलकरांसाठी अभिमानास्पद व कौतुकास्पद बाब आहे.