शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आजोबांची कमाल! वयाच्या शंभराव्या वर्षी पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2022 16:48 IST

आजोबांना १७ व्या वर्षापासूनच कविता लिहिण्याचा छंद होता. मात्र, त्यांनी त्याचा कवितासंग्रह प्रकाशित केला नव्हता. तर आता वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले असून नववर्षदिनी काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा पार पडला.

ठळक मुद्देकृष्णराव माधवराव दळवी : वयाच्या १७ व्या वर्षापासून लिहिलेल्या कवितांचा समावेश

नागपूर : या जगात प्रत्येकाला काही ना काही छंद असतोच. कुणाला चित्र काढण्याचा, क्रिकेट खेळायचा, गाण्याचा, नाचण्याचा पण तो छंद आयुष्यभर जपणारे काहीच. एका आजोबांनी आपला कविता लिहिण्याचा छंद जोपासला आणि  वयाच्या शंभरीत आपले पहिले कवितासंग्रह प्रकाशित केले. या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा नववर्षदिनी पार पडला.

कृष्णराव माधवराव दळवी यांचा जन्म १ जानेवारी १९२३ चा भंडारा जिल्ह्यातील पवनी येथचा. १ जानेवारी २०२२ रोजी त्यांनी वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले. ते भारत सरकारच्या सिव्हिल डिफेन्स (नेव्ही) विभागातून क्लास वन अधिकारी म्हणून निवृत्त झाले. आपल्या आयुष्यातील आलेले अनुभव व मनात संचारणाऱ्या कल्पनांना त्यांनी कवितांचे आवरण चढवले.

कृष्णराव यांना कविता लिहिण्याचा छंद वयाच्या १७व्या वर्षापासूनच होता. मात्र, त्या प्रकाशित करण्याचा मानस त्यांनी कधीच व्यक्त केलेला नव्हता. त्यामुळे त्यांचा हा शतक पदार्पण सोहळा संस्मरणीय करण्याची कल्पना स्नुषा डॉ. अपर्णा दळवी, मुलगा दीपक दळवी यांच्या मनात आली. त्याअनुषंगाने कृष्णराव यांच्या निवडक ७५ कवितांचा संग्रह ‘मर्मध्वनी’ साकारण्याची कल्पना आली आणि मिलिंद हरदास यांनी प्रकाशनाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली.

त्याअनुषंगाने १ जानेवारी २०२२ रोजी वयाच्या शतक पदार्पण सोहळ्यात या काव्यसंग्रहाचे प्रकाशन वैशाली मुलमुले यांच्या हस्ते करण्यात आले. वयाच्या शंभराव्या वर्षी आयुष्यभर रचलेल्या कवितांचा काव्यसंग्रह प्रकाशित होणे, हा एक दुर्मिळ योग ठरला. हा सोहळा शंकरपूर येथील बालाजी मंदिरात पार पडला. यावेळी अंजली पाठक, डॉ. उदय नारलावार यांच्यासह कौटुंबिक मंडळी उपस्थित होती.

टॅग्स :SocialसामाजिकSenior Citizenज्येष्ठ नागरिक