'त्याने' दगडाने ठेचून केली मित्राची हत्या अन् स्वत:च ठाण्यात जाऊन दिली गुन्ह्याची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2021 12:31 IST2021-11-18T12:27:27+5:302021-11-18T12:31:28+5:30

दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातून एकाने आपल्या मित्राची दगडाने ठेचून हत्या केली. व त्यानंतर स्वत:च पोलीस ठाण्यात पोहचून गुन्ह्याची कबुली दिली.

man murdered his friend over small dispute | 'त्याने' दगडाने ठेचून केली मित्राची हत्या अन् स्वत:च ठाण्यात जाऊन दिली गुन्ह्याची कबुली

'त्याने' दगडाने ठेचून केली मित्राची हत्या अन् स्वत:च ठाण्यात जाऊन दिली गुन्ह्याची कबुली

नागपूर : दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातून एका युवकाने त्याच्या मित्राची दगडाने ठेचून हत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी नंदनवन परिसरातील सेंट झेवियर्स स्कूलच्या जवळ घडली. आरोपीने ठाण्यात पोहचून गुन्ह्याची कबुली दिली. मृतकाचे नाव दिनेश विनायक राजापुरे (४०, रा. दर्शन कॉलनी), तर आरोपीचे नाव अतुल हेमराज शिवणकर (२३ रा. श्रीनगर) असे आहे.

दिनेश व अतुल पेंटिंगची कामे करतात. अतुल दिनेशला भाऊजी म्हणत होता. दोघेही सोबत काम करीत होते. दिनेशला दारूचे व्यसन होते. त्यामुळे त्याची पत्नी दोन मुलांसह वेगळी राहत होती. बुधवारी दोघांनाही पेंटिंगच्या कामाचे १ हजार रुपये मिळाले. दोघांनी दारू विकत घेतली व सेंट झेवियर्स स्कूलजवळील झुडपात पीत बसले होते. दरम्यान, ३ च्या सुमारास त्यांच्यात वाद झाला. अतुलच्या सांगण्यानुसार दिनेशने त्याला शिवीगाळ केली व थापडही मारली. त्यामुळे संतप्त झालेल्या अतुलने त्याच्या डोक्यावर दगडाने वार केला. यात दिनेशचा जागेवरच मृत्यू झाला.

यानंतर अतुल घटनास्थळावरून थेट नंदनवन ठाण्यात पोहोचला. त्याने पोलिसांना मी माझ्या मित्राचा खून केला, म्हणत खुनाची कबुली दिली. पोलीस अतुलला घेऊन घटनास्थळावर पोहोचल्यानंतर त्यांना दिनेशचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. पोलिसांनी अतुलला अटक करून दिनेशचे पार्थिव मेडिकलला रवाना केले, व आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: man murdered his friend over small dispute