लग्नास नकार, गळा आवळून प्रेयसीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2021 10:22 AM2021-12-09T10:22:43+5:302021-12-09T10:32:56+5:30

दुपट्ट्याने गळा आवळून प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास गांधीसागर जवळील एम्प्रेस मॉलमध्ये चौथ्या माळ्यावर उघडकीस आली. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

man kills girlfriend after refusal of wedding proposal in nagpur | लग्नास नकार, गळा आवळून प्रेयसीची हत्या

लग्नास नकार, गळा आवळून प्रेयसीची हत्या

Next

नागपूर : लग्नास नकार दिल्याने एका तरुणाने आपल्या प्रेयसीची गळा आवळून हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

ही घटना बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास गांधीसागर जवळील एम्प्रेस मॉलमध्ये चौथ्या माळ्यावर उघडकीस आली. फरजाना (२१) रा. गिट्टीखदान असे मृत प्रेयसीचे तर मुजाहिद अंसारी (२२) रा. मोमिनपुरा असे प्रियकराचे नाव आहे. फरजाना व मुजाहिदचे एकमेकांवर प्रेम होते. ते दोघे लग्नही करणार होते. परंतु काही दिवसांपूर्वी फरजानाचे एका दुसऱ्या युवकासोबत साक्षगंध झाले. त्यामुळे मुजाहिद संतापला होता.

२ डिसेंबरला त्याने फरजानाला भेटण्यासाठी बोलावले. ती मुजाहिदला भेटली. तो तिला घेऊन एम्प्रेस मॉलमध्ये गेला. तेथे चौथ्या माळ्यावरील एका खोलीत त्याने तिची गळा आवळून हत्या केली आणि आपल्या घरी गेला. दरम्यान फरजानाच्या नातेवाईकांनी गिट्टीखदान पोलिसात तक्रार नोंदविली. पोलिसांनी मोबाईल रेकॉर्डवरून मुजाहिदची सक्तीने चौकशी केली असता त्याने फरजानाची हत्या केल्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: man kills girlfriend after refusal of wedding proposal in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app