बोलणे बंद केल्यामुळे 'त्याने' मित्रावरच ब्लेडने केले वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2021 16:02 IST2021-11-14T15:59:50+5:302021-11-14T16:02:03+5:30
बोलणे बंद केले म्हणून संतप्त झालेल्या व्यक्तीने आपल्या मित्रावर ब्लेडने वार करून त्याला जखमी केले. ही घटना शुक्रवारी सकाळी कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत घडली.

बोलणे बंद केल्यामुळे 'त्याने' मित्रावरच ब्लेडने केले वार
नागपूर : बोलणे बंद का केले ? या कारणावरून आपल्या मित्रावरच ब्लेडने वार करून त्यास जखमी केल्याची घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान घडली. अभय विश्वनाथ सहस्त्रबुद्धे (वय १८, रा. किल्ला रोड महाल असे जखमी मुलाचे नाव असून राजु सुरेशसिंग ठाकुर (४०) असे आरोपीचे नाव आहे.
अभय आणि आरोपी राजु ठाकुर हे ऐकमेकांचे मित्र आहेत. दोघेही मिठा निम दरगाहजवळ राहतात आणि तेथेच झोपतात. मात्र, वर्षभरापूर्वी अभय आपल्या आईकडे महाल भागात रहावयास आला. त्याने ताजबागजवळ एक कामही शोधले. यामुळे, त्यांचे बोलणे कमी झाले, याचा राग राजुने मनात ठेवला.
शुक्रवारी अभय कामावर जात असताना आरोपी राजुने त्यास एचडी हॉस्पिटलमागे, हनुमान मंदिराजवळ अडविले. तु माझ्याशी का बोलत नाही अशी विचारणा केली. यावेळी अभयने आईने तुझ्याशी बोलण्यास मनाई केल्याचे सांगितले. यावर आरोपीने संतप्त होऊन आपल्या जवळील ब्लेडने अभयच्या गालावर, डाव्या हातावर आणि कंबरेवर वार करून त्यास जखमी केले. अभयने दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुखदेव मडावी करीत आहेत.