भाजयुमोने नागपुरात जाळला ममता बॅनर्जीचा पुतळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 11:39 IST2019-05-16T11:35:18+5:302019-05-16T11:39:39+5:30

भाजपाची युवा ब्रिगेड भारतीय जनता युवा मोर्चाने (भाजयुमो) बुधवारी कोलकाता येथे भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या रोड शोदरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात निदर्शने केली.

Mamta Banerjee statue burnt by BJP in Nagpur | भाजयुमोने नागपुरात जाळला ममता बॅनर्जीचा पुतळा

भाजयुमोने नागपुरात जाळला ममता बॅनर्जीचा पुतळा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपाची युवा ब्रिगेड भारतीय जनता युवा मोर्चाने (भाजयुमो) बुधवारी कोलकाता येथे भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या रोड शोदरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात निदर्शने केली. या दरम्यान कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला. सीताबर्डी पोलिसांनी संघटनेच्या पाच कार्यकर्त्यांवर कलम १३५ अंतर्गत कारवाई केली.
आंदोलनात भाजयुमोची शहराध्यक्ष शिवानी दाणी, राहुल खंगार, कमलेश पांडे, नितीन करारे, आलोक पांडे, नेहल खानोरकर, गुड्डू पांडे, भक्ती आमटे, मयूर इंगोले, मेधवानी यांचा समावेश होता.

Web Title: Mamta Banerjee statue burnt by BJP in Nagpur