भाजयुमोने जाळला ममता बॅनर्जींचा पुतळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:27 IST2020-12-12T04:27:18+5:302020-12-12T04:27:18+5:30

नागपूर : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यावर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हल्ल्याचा शुक्रवारी नागपुरात निषेध करण्यात आला. भारतीय ...

Mamata Banerjee's statue burnt by BJP | भाजयुमोने जाळला ममता बॅनर्जींचा पुतळा

भाजयुमोने जाळला ममता बॅनर्जींचा पुतळा

नागपूर : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यावर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हल्ल्याचा शुक्रवारी नागपुरात निषेध करण्यात आला. भारतीय जनता युवा मोर्चातर्फे उत्तर नागपुरातील कमाल चौक येथे निदर्शने करण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसचे कार्यकर्ते गुंडगिरी करत असल्याचा आरोप करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पुतळा जाळण्यात आला.

जे.पी.नड्डा व कैलाश विजयवर्गीय पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. यामुळे देशातील विविध भागांसोबतच नागपुरातदेखील भाजप कार्यकर्त्यांमध्ये रोष असून त्याचा विरोध म्हणून आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष आ.प्रवीण दटके, भाजयुमो अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले, संजय चौधरी, जितेंद्रसिंग ठाकूर, कल्याण देशपांडे, राहुल खंगार, आलोक पांडे, दिपांशू लिंगायत,कमलेश पांडे, वैभव चौधरी, सचिन सावरकर, अमर धमार्रे, यश सातपुते, रितेश रहाटे, पीयूष बोईनवार, अथर्व त्रिवेदी, अंकुर थेरे, आशिष मेहर, संकेत कुकडे, गौरव हरड़े, पवन महाकाळकर, अमित दहासहस्त्र,सागर बनोदे, हिमांशू शुक्ला, सुमित पाठक, रोहित त्रिवेदी, उदय मिश्रा, कौस्तुभ दाणी प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: Mamata Banerjee's statue burnt by BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.