नाट्यक्षेत्रातील कर्तृत्त्ववान मामा हरपले ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:07 IST2020-12-02T04:07:31+5:302020-12-02T04:07:31+5:30
नागपूर : वैदर्भीय रंगभूमीसाठी आयुष्य वेचणारे माजी नाट्य संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ रंगकर्मी राम जाधव यांचे प्रदीर्घ आजाराने दिल्ली येथे मुलाकडे ...

नाट्यक्षेत्रातील कर्तृत्त्ववान मामा हरपले ()
नागपूर : वैदर्भीय रंगभूमीसाठी आयुष्य वेचणारे माजी नाट्य संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ रंगकर्मी राम जाधव यांचे प्रदीर्घ आजाराने दिल्ली येथे मुलाकडे निधन झाले. त्यांची नाट्यक्षेत्राप्रति अपार श्रद्धा होती. त्यांच्या जाण्याबद्दल त्यांचे मूळ शहरच नव्हे तर विदर्भातून खंत व्यक्त केली जात आहे.
दलित समाजातून वर येऊन वैदर्भीय नाट्यक्षेत्राला कलाटणी देणारा आणि नवोदित नाट्यलेखकांना कायम प्रोत्साहन देणारा असा कलावंत म्हणजे राम जाधव होत. त्यांच्या जाण्याने वैदर्भीय रंगभूमी नक्कीच पोरकी झाली आहे. नागपूर नाट्य परिषदेतर्फे त्यांना श्रद्धांजली.
- प्रफुल्ल फरकसे : अध्यक्ष - अ.भा. मराठी नाट्य परिषद, नागपूर शाखा
विदर्भातील हौशी, प्रायोगिक रंगभूमीचे एक संवर्धक, आधारस्तंभ आणि तिला आकार देत रसिकाश्रय या त्यांच्या संस्थेमार्फत त्यांनी निरंतर कार्य केले. मराठी रंगभूमी संवर्धित करण्यात राम जाधवांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांना श्रद्धांजली.
- डॉ. श्रीपाद जोशी : माजी अध्यक्ष - अ.भा. मराठी साहित्य महामंडळ
* विदर्भातील नाट्यक्षेत्राला बळकटी देणारे आणि वयाच्या ८० व्या वर्षातही रंगभूमीसाठी झटणारे राम जाधव यांचे मोठे योगदान आहे. नाट्य परिषदेशी त्यांचा स्नेह कायम राहिला आहे. त्यांना भावपूर्ण आदरांजली.
- नरेश गडेकर : उपाध्यक्ष - अ.भा. मराठी नाट्य परिषद, मुंबई
* वैदर्भीय नाट्यसृष्टीचे प्रचंड नुकसान. प्रकाश लुंगे यांच्यानंतर मामांचे निर्वाण हा विदर्भाला बसलेला दुसरा आघात आहे. ते खऱ्या अर्थाने विदर्भाचे नटसम्राट होते. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
- सलीम शेख : अध्यक्ष - अ.भा. मराठी नाट्य परिषद, महानगर शाखा
......