शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
3
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
4
पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार
5
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
6
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
7
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
8
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
9
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
10
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
11
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
12
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
13
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
14
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
15
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
16
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
17
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
18
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
19
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

वन विभागाच्या दुर्लक्षपणामुळे माळढोक संवर्धन धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 11:50 AM

Nagpur News Wildlife माळढोक संवर्धनाची क्षमता असूनही येथील शेतमाळातून आता माळढोक हद्दपार व्हायला लागले आहे.

ठळक मुद्देनानजपेक्षा अधिक सक्षमतामात्र संवर्धनाअभावी संख्या घटली

गोपालकृष्ण मांडवकरनागपूर : वन विभागाने नानजमध्ये उभारलेल्या माळढोक अभयारण्यापेक्षा वरोरा-मार्डा परिसरातील वातावरण या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी पोषक आहे. मात्र या कामी वन विभागाचा कायदेशीरदृष्ट्या पुढाकार नाही, शेतकऱ्यांना योग्य प्रशिक्षण नाही, वास्तविकता डोळ्यासमोर ठेवून कायदे नाहीत, त्यामुळे माळढोक संवर्धनाची क्षमता असूनही येथील शेतमाळातून आता माळढोक हद्दपार व्हायला लागले आहे.माळढोक संवर्धनासाठी या कामी आवड असणाऱ्या अधिकाऱ्यांनी भरपूर प्रयत्न केले. मात्र त्याला वन विभागाने म्हणावा तसा आधार दिला नाही. त्यामुळे अधिकारी बदलून गेले किंवा निवृत्त झाले की मोहीम थंडावते, असाच येथील अनुभव आहे. संजय ठाकरे हे मुख्य वनसंरक्षक असताना पयार्यी अधिवास निर्मिती व सेंद्रिय शेतीसाठी प्रयत्न झाले. पक्षांना रेडिओ कॉलर लावून अभ्यास केला गेला होता. मात्र पुढे हे कार्य सातत्याने चालले नाही. वनरक्षक लालसरे यांच्यासह काही सामाजिक संस्थांनीही यात पुढाकार घेतला होता.१७ जुलै २००५ मध्ये झालेल्या एक दिवसीय माळढोक प्रगणनेमध्ये वरोरा-भद्रावती तालुक्यातील ४०० चौरस मीटर असंरक्षित क्षेत्र ६ अधिक माळढोक असल्याची नोंद झाली होती तर नानजमधील संरक्षित क्षेत्र ८५०० चौरस मीटर असून एवढ्या मोठ्या क्षेत्रात फक्त २२ ते २८ माळढोक (हुम) आढळले होते. यावरून या क्षेत्रातील पोषकता लक्षात येते. मात्र सध्या येथील माळढोक घटले असून ही संख्या फक्त ३ ते ४ असावी, असा अंदाज आहे.वन विभागाने शेतकऱ्यांना प्रोत्साहनाची हमी द्यावी. वास्तव लक्षात घेऊन कायदे व्हावे. माळढोकचा वावर असणारी जागा वन विभागाने अधिवास म्हणून घोषित करावी, शेतकरऱ्यांना बक्षीस रूपाने प्रोत्साहित करावे.गोपाल ठोसर, माळढोक अभ्यासक

टॅग्स :wildlifeवन्यजीव