शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

पित्याचे शासकीय निवासस्थान मुलाच्या नावाने करा; ‘मॅट’चा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2020 2:18 PM

Mat, Police, Nagpur News फौजदार म्हणून सेवानिवृत्त झालेल्या पित्याचे शासकीय निवासस्थान महिनाभरात पोलीस शिपाई मुलाच्या नावाने करून द्या, असा निर्णय मुंबई ‘मॅट’चे न्यायिक सदस्य ए.पी. कुऱ्हेकर यांनी २५ सप्टेंबर रोजी दिला.

ठळक मुद्देपोलीस शिपायाला दिलासा, दरमाह ६७ हजारांचा दंडही रद्द

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : फौजदार म्हणून सेवानिवृत्त झालेल्या पित्याचे शासकीय निवासस्थान महिनाभरात पोलीस शिपाई मुलाच्या नावाने करून द्या, असा निर्णय मुंबई ‘मॅट’चे न्यायिक सदस्य ए.पी. कुऱ्हेकर यांनी २५ सप्टेंबर रोजी दिला.फौजदार पांडुरंग कारंडे आणि त्यांचा मुलगा अनिल कारंडे यांनी ‘मॅट’मध्ये अ‍ॅड. भूषण बांदिवडेकर व अ‍ॅड. गौरव बांदिवडेकर यांच्यामार्फत स्वतंत्र याचिका दाखल केल्या होत्या. दोघेही मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. पांडुरंग हे फौजदार पदावरून ३ सप्टेंबर २०१७ ला सेवानिवृत्त झाले. त्यावेळी त्यांच्या मुलाची पोलीस शिपाई म्हणून चार वर्षे सेवा झाली होती. वडील निवृत्त होण्याआधीच २ सप्टेंबरला अनिलने वडिलांचे शासकीय निवासस्थान आपल्या नावे करून द्यावे म्हणून पोलीस आयुक्तांकडे अर्ज केला. मात्र फौजदाराला ४५० चौरस फूट तर शिपायाला १८० ते ३५० चौरस फूट जागा देण्याचा अलॉटमेंट कमिटीचा २ फेब्रुवारी २०१५ चा निर्णय असल्याचे सांगत ‘एसीपी’ (मुख्यालय-३) मुंबई यांनी अनिलचा अर्ज फेटाळला. घरखाली करण्याबाबत नोटीस बजावून प्रति महिना ६७ हजार रूपये दंड व भाडे भरण्याचे आदेश दिले. ‘मॅट’ने या दोन्ही मुद्यांवर ‘स्टे’ दिला.

समितीच्या निर्णयपेक्षा ‘जीआर’ मोठाअ‍ॅड. बांदिवडेकर यांनी गृहविभागाचा १ डिसेंबर २०१६ चा जीआर ‘मॅट’च्या निदर्शनास आणून दिला. त्यात शिपाई ते फौजदार यांना ५०० चौरस फुटाचे शासकीय निवासस्थान देण्याचे नमूद आहे. यावर निर्णय देताना ‘मॅट’ने अलॉटमेंट समिती पेक्षा शासनाने धोरणात्मक निर्णय म्हणून काढलेला जीआर मोठा आहे, असे सांगत अनिल कारंडे यांना दिलासा दिला. त्यांचा दंड बेकायदेशीर ठरवून रद्द केला, महिनाभरात वडिलांचे निवासस्थान त्यांच्या नावे करण्याचे आदेश दिले. यावेळी शासनाच्या १० ऑक्टोबर २००२ च्या जीआरचा हवाला दिला गेला. यात कुटुंबातील कुणीही व्यक्ती पोलीस खात्यात असेल तर त्याला राहते निवासस्थान हस्तांतरित करण्याचे नमूद आहे. या खटल्यात शासनाच्यावतीने सादरकर्ता अधिकारी क्रांती गायकवाड यांनी काम पाहिले. याचिकाकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड. अरविंद बांदिवडेकर, अ‍ॅड. गायत्री बांदिवडेकर यांनी सहकार्य केले.

‘एसीपी’ला अधिकार नाहीतपोलीस आयुक्तालयात निवासस्थान खाली करण्याबाबत नोटीस बजावण्याचे अधिकार हे सहायक पोलीस आयुक्तांना नसून उपायुक्तांना असल्याचे शिक्कामोर्तबही ‘मॅट’मध्ये करण्यात आले.

टॅग्स :Courtन्यायालय