मतदार यादीत दुरू स्ती करा
By Admin | Updated: June 1, 2014 01:01 IST2014-06-01T01:01:36+5:302014-06-01T01:01:36+5:30
नुक त्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शहरातील एक लाख लोकांची नावे मतदार यादीत नव्हती. त्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले होते. विधानसभा निवडणुकीत याची पुनरावृत्ती होऊ नये

मतदार यादीत दुरू स्ती करा
भाजपची मागणी : जिल्हाधिकार्यांना दिले निवेदन
नागपूर : नुक त्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शहरातील एक लाख लोकांची नावे मतदार यादीत नव्हती. त्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले होते. विधानसभा निवडणुकीत याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मतदार यादीत सुधारणा करा, अशी मागणी भाजपचे शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे,सुधाकर देशमुख, विकास कुंभारे आदींच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने शनिवारी जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
मतदार यातीत शहरातील सर्व नागरिकांच्या नावाचा समावेश करण्यात यावा, मतदान केंद्र घरापासून जवळ असावे, मतदानाच्या झोनमध्ये वाढ करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकार्यांकडे केली.
शिष्टमंडळात संघटन महामंत्री o्रीकांत देशपांडे, राजेश बागडी, शहर महामंत्री प्रभाकर येवले, सुधाकर कोहळे, संदीप जोशी , उपमहापौर जैतुन्नबी अन्सारी, सत्तापक्ष नेते प्रवीण दटके, गिरीश देशमुख, माजी महापौर माया इवनाते, अर्चना डेहनकर, डॉ. किर्तीदा अजमेरा, रमेश शिंगारे, महेंद्र राऊ त, सुभाष कोटेचा, अनुपमा मिo्रा, ज्योती जनबंधू, प्रवीण भिसीकर, दीपक कामवानी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.(प्रतिनिधी)