शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

शिक्षणातून जीवनाला सार्थक बनवा :श्रीनिवास वरखेडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 12:48 AM

शिक्षणातून आयुष्य घडविण्याऐवजी जीवनाला सार्थक बनविण्यावर भर असला पाहिजे, असे मत कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी यांनी केले.

ठळक मुद्दे‘इग्नू’चा दीक्षांत समारंभ साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षणाचा खरा अर्थ हा ज्ञानाचे हस्तांतरण असा नाही तर ज्ञान प्राप्त करणे असा होतो. शिक्षणाला कधीच अंत नसतो. आयुष्याला ते एक दिशा देणारे माध्यम आहे. शिक्षणातून आयुष्य घडविण्याऐवजी जीवनाला सार्थक बनविण्यावर भर असला पाहिजे, असे मत कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी यांनी केले. ‘इग्नू’च्या ३३ व्या दीक्षांत समारंभादरम्यान ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.हिस्लॉप महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या सोहळ्याला ‘इग्नू’च्या प्रादेशिक केंद्राचे संचालक डॉ.पी.शिवस्वरूप प्रामुख्याने उपस्थित होते. दीक्षांत समारंभात नागपूर केंद्रातून ११२४ विद्यार्थ्यांना पदवी व पदविकांचे वितरण करण्यात आले. तर रसायनशास्त्रातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमातील कामगिरीसाठी ज्योती दासिला हिला सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले. आयुष्यात आलेल्या विविध अडचणींमुळे अर्ध्यामध्ये शिक्षण सुटलेल्यांसाठी ‘इग्नू’ हे महत्त्वाचे माध्यम आहे. ‘इग्नू’सारख्या मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेणारे विद्यार्थी हे स्वत: गुरू आणि विद्यार्थी बनून आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत आहेत. पदवी घेतल्याने व्यक्ती केवळ शिक्षित होत नाही तर सुसंस्कृतदेखील होतो, असे डॉ.वरखेडी यावेळी म्हणाले. डॉ.पी.शिवस्वरूप यांनी यावेळी वर्षभरातील कामगिरीवर प्रकाश टाकला. डॉ.ऋषी अग्रवाल यांनी संचालन केले तर डॉ.वेंकटेश्वरलू यांनी आभार मानले. कार्यक्रमाला डॉ.शंकर तत्त्ववादी, डॉ.रमेश ठाकरे, डॉ.पी.टी.शुक्ला, डॉ.आर.पी.ठाकरे, डॉ.नागराज, प्रा.विजेंदर कुमार, डॉ.शुभजित हलदार प्रामुख्याने उपस्थित होते.चार कैद्यांना मिळाली पदविकादीक्षांत समारंभादरम्यान नागपूर मध्यवर्ती कारागृहातील चार कैदीदेखील पदविकेसाठी पात्र ठरले. या चारही कैद्यांनी ‘डिप्लोमा इन मॅनेजमेंट’ हा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केला. त्यांना कारागृहात विशेष कार्यक्रमादरम्यान पदविका प्रदान करण्यात येणार आहेत.दृष्टिहीन असूनदेखील गाठले पदवीचे शिखरया दीक्षांत समारंभात जन्मापासूनच दृष्टिहीन असलेल्या पवन पांडुरंग वंजारी या शिक्षकानेदेखील पदवीचे आणखी एक शिखर गाठले. अगोदर ‘एमए’ केलेल्या पवन यांनी ‘बीएड’ची पदवी ‘इग्नू’तून प्राप्त केली. रामटेक तालुक्यातील एका शासकीय आश्रमशाळेत कार्यरत असलेल्या पवन यांना प्रवेशानंतर ‘इग्नू’तून अभ्यासाचे साहित्य मिळाले. माझे वडील मला साहित्य वाचून दाखवायचे व त्यातून मी अभ्यास केला. अनेक अडथळे आले; परंतु कुटुंबीय सोबत असल्याने मी निराश झालो नाही, असे पवन वंजारी यांनी सांगितले.‘इग्नू’ने नवीन दिशा दाखविलीमी नियमित शिक्षण घेऊन रसायनशास्त्रात पदव्युत्तर अभ्यासक्रम करीत आहे. मात्र ‘इग्नू’तील अभ्यासक्रमाने मला आणखी मदत होईल, असा माझ्या शिक्षकांनी सल्ला दिला. त्यानुसार मी पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. या अभ्यासक्रमाने मला नवीन दिशा दाखविली आहे, असे मत सुवर्ण पदक विजेती विद्यार्थिनी ज्योती दासिला हिने व्यक्त केले.

टॅग्स :Indira Gandhiइंदिरा गांधीuniversityविद्यापीठ