शहरात काँग्रेस मजबूत करा
By Admin | Updated: September 9, 2014 01:13 IST2014-09-09T01:13:36+5:302014-09-09T01:13:36+5:30
आघाडी सरकारने लोकहिताची बरीच कामे केली आहेत. जनहिताचे निर्णय घेतले आहे. येत्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी शहरात काँग्रेसला मजबूत करा, असे आवाहन वित्त

शहरात काँग्रेस मजबूत करा
राज्यमंत्री मुळक : काँग्रेसच्या शंकरनगर कार्यालयाला भेट
नागपूर : आघाडी सरकारने लोकहिताची बरीच कामे केली आहेत. जनहिताचे निर्णय घेतले आहे. येत्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी शहरात काँग्रेसला मजबूत करा, असे आवाहन वित्त व ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी केले. राज्यमंत्री मुळक यांनी शहर काँग्रेस समितीच्या धरमपेठ प्रभागातील शंकरनगर-रामदासपेठ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. प्रारंभी प्रभाग क्रमांक ५२ चे विभाग अध्यक्ष पराग कुळकर्णी यांनी राज्यमंत्री मुळक यांचे स्वागत केले. याप्रसंगी धु्रव नारायण जैस्वाल, संदेश सिंगलकर, कमलेश पाटील, संजय खोडे, राजेंद्र वारके, अॅड. यशवंत अडवाणी, कैलास कनोजिया, गणेश श्रीवास, मनोज धु्रव, मनोज कोवे, बबलू पठाण, शाहीद खान, सुनील छलवानी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)