शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

२२ देशांमधील प्रमुख बौद्ध धम्मगुरू येणार

By admin | Updated: September 13, 2014 02:39 IST

देश विदेशातील अनेक बौद्ध भिक्खू आणि अनुयायी दीक्षाभूमीवर दरवर्षीच येत असतात. दरवर्षी यात वाढ होत आहे.

नागपूर : देश विदेशातील अनेक बौद्ध भिक्खू आणि अनुयायी दीक्षाभूमीवर दरवर्षीच येत असतात. दरवर्षी यात वाढ होत आहे. परंतु दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तनाच्या मुख्य सोहळ्यासाठी २२ देशांमधील प्रमुख बौद्ध धम्मगुरु एकाचवेळी पहिल्यांदाच येणार आहे. यंदाचे हे विशेष आकर्षण राहणार असून धार्मिक कार्यक्रमांवर विशेष भर देण्यात येणार आहे. ३ आॅक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यापार्श्वभूमीवर तयारीला सुरुवात झाली आहे. विविध बौद्ध राष्ट्रांमधील भिक्खूगण आणि अनुयायी मागील काही वर्षांपासून नागपुरात सातत्याने येत आहेत. परंतु यंदा ते दीक्षाभूमीच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी राहणार आहेत. इतकेच नव्हे तर त्यांच्या उपस्थितीमध्ये दीक्षाभूमीवर धम्म परिषदही आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे ही परिषद खऱ्या अर्थाने जागतिक धम्म परिषद राहणार आहे. (प्रतिनिधी)महापौरांनी घेतला व्यवस्थेचा आढावा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर महापालिकेतर्फे करण्यात येणाऱ्या विविध व्यवस्थेचा आढावा महापौर प्रवीण दटके यांनी शुक्रवारी घेतला. स्मारक समितीच्या मार्गदर्शनाखाली मनपातर्फे अस्थायी टॉयलेट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्युत सेवा, अग्निशमन सेवा, स्वच्छता आदी व्यवस्था करण्याचे आश्वासन महापौरांनी दिले. यावेळी महापौरांनी दीक्षाभूमी परिसराची पाहणी केली. तसेच मध्यवर्ती स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अस्थिकलशाचे दर्शन घेऊन तथागत गौतम बुद्धांना अभिवादन केले. स्मारक समितीतर्फे सदानंद फुलझेले यांनी महापौरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. समितीचे सदस्य विलास गजघाटे, विजय चिकाटे यांनी मनपा अधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी उपहापौर गणेश (मुन्ना) पोकुलवार, आयुक्त श्याम वर्धने, माजी महापौर आ. अनिल सोले, गोपाल बोहरे, रमेश सिंगारे, संदीप जोशी, बंडू राऊत, मुन्ना यादव, माजी उपमहापौर संदीप जाधव प्रामुख्याने उपस्थित होते. भोजनदानाची व्यवस्था ठराविक ठिकाणी करावी दीक्षाभूमीवर देशाच्या कानाकोपऱ्यातून येणारी आंबेडकरी बौद्ध अनुयायी उपाशी राहू नयेत म्हणून शहरातील हजारो संघटना भोजनदानाची व्यवस्था करीत असतात. परंतु त्यात काही तारतम्य राहत नसल्याने अन्न वाया जाते. तसेच अनुयायांनाही त्रास होतो. तेव्हा भोजनदानाची व्यवस्था ठराविक जागेत करण्यात यावी, अशी विनंती मनपा आयुक्त श्याम वर्धने यांनी स्मारक समितीला केली. या ठिकाणी मनपाच्या दहाही झोनच्या सहायक आयुक्तांची ड्युटी लावण्यात येईल. या ठिकाणी मनपा २४ तास सेवा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.