फ्लायओव्हरवरील झटके दूर करण्यासाठी मेंटेनन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:08 IST2021-06-24T04:08:27+5:302021-06-24T04:08:27+5:30
नागपूर : नॅशनल हायवे ॲथारिटी ऑफ इंडियाच्या नागपूर रिजन अंतर्गत महामार्गांवर आणि फ्लायओव्हरवर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्ससचे काम सुरू आहे. या ...

फ्लायओव्हरवरील झटके दूर करण्यासाठी मेंटेनन्स
नागपूर : नॅशनल हायवे ॲथारिटी ऑफ इंडियाच्या नागपूर रिजन अंतर्गत महामार्गांवर आणि फ्लायओव्हरवर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्ससचे काम सुरू आहे. या अंतर्गत मानकापूर आरओबी व फ्लायओव्हरवर जुळणाऱ्या आणि अधिक धक्के बसणाऱ्या पुलांचा भाग दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. या भागातील सर्व्हिस रोडच्या कामाचीही दुरुस्तीही सुरू झाली आहे. एनएचएआयच्या नागपूर विभागात अशी अनेक ठिकाणे हुडकून काढण्यात आली होती. त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. पावसाळ्यात रस्त्यावर आणि फ्लायओव्हरवर जमा होणारे पाणी काढण्याची व्यवस्थाही या कामादरम्यान होणार आहे.
दरम्यान, सदर फ्लायओव्हरवर झटके बसणाऱ्या भागात दुरुस्तीचे काम सुरू झालेले दिसत नाही. खालच्या रोडवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. या फ्लायओव्हरवर काही ठिकाणी साईन बोर्ड लावले जाणार होते, ते अद्याप लागलेले नाहीत.