शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मेंदूच्या निरोगी आरोग्यासाठी मुखाचे आरोग्य चांगले ठेवा-डॉ. चंद्रशेखर मेश्राम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 20:51 IST

डेन्टलमध्ये दंत शिक्षण व संशोधन परिषद

नागपूर: निरोगी जीवनासाठी शरीराच्या इतर अवयवांप्रमाणे मेंदूचे पोषण करणे हे देखील एक महत्त्वाची बाब आहे; परंतु अनेकदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मेंदूच्या आरोग्यासाठी मुखाचे आरोग्य चांगले ठेवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ न्यूरोलॉजिस्ट पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी येथे केले. पद्मश्री पुरस्कार जाहिर झाल्यानंतर त्यांच्या हा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम होता.

नागपूरच्या  शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय (डेन्टल) व वैद्यकीय शिक्षण विभागाच्यावतीने सोमवारी महाविद्यालयाच्या सभागृहात मौखिक आरोग्य दिनानिमित्त ‘दंत शिक्षण व संशोन परिषद-२०२४’चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. मेश्राम प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मंचावर वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सहसंचालक (दंत) डॉ. विवेक पाखमोडे, विभागाचे सहसंचालक डॉ. मिलिंद फुलपाटील, मुंबईच्या दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. वसुंधरा भड, औरंगाबादच्या अधिष्ठाता डॉ. माया इंदूरकर, परिषदेचे आयोजक अध्यक्ष व नागपूरचे अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर, आयोजन सचिव डॉ. रितेश कळसकर व परिषदेचे वैज्ञानिक प्रभारी डॉ. ज्योती मानचंदा उपस्थित होत्या. दरम्यान डॉ. मेश्राम यांना स्मृतिचिन्ह दऊन सन्मानित करण्यात आले. संचालन डॉ. शभा हेडगे यांनी केले तर आभार डॉ. रितेश कळसकर यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. अरुण खळीकर, डॉ. अशिता कळसकर, डॉ. मंजुषा वºहाडपांडे, डॉ. सुलभा रडके, डॉ. वैभव कारेमोरे, डॉ. सचिन खत्री यांच्यासह वरीष्ठ डॉक्टर, विद्यार्थी उपस्थित होते.

-साखर व मीठामुळे मुखाच्या आरोग्य समस्याडॉ. मेश्राम म्हणाले, जास्त साखर आणि मीठ खाल्ल्याने दात आणि मुखाच्या आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात, हे आपल्याला माहितच आहे. परंतु हे दोन पांढरे पदार्थ मेंदूसाठीही अनेक समस्या निर्माण करतात. भूक न लागताही खात राहणे, हे मुखाचे आणि मेंदूचे आरोग्य बिघडण्याला कारणीभूत ठरतात. दिवसांतू एकदा किंवा दोनदा खाणे आदर्श मानले जाते. ‘इंटरमीडिएट फास्टिंग’मुळे मेंदूच्या कार्यक्षमतेसह एकूणच आरोग्यासाठी फायद्याचे ठरते. भेसळयुक्त अन्नामुळे विविध प्रकाराचे आजार निर्माण होतात. यामुळे खाण्यापूर्वी काय खाता, याचा विचार करणे गरजे आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :nagpurनागपूरHealth Tipsहेल्थ टिप्स