शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

एसएनडीएलच्या भागीदाराबाबत महावितरण घेणार कायदेशीर सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 23:09 IST

शहरातील वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलतर्फे भागीदार (स्ट्रॅटेजिक पार्टनर) आणण्याच्या प्रयत्नाबाबत महावितरणने कडक भूमिका घेतली आहे. यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेण्यात येणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. जर ग्राहकांना याचा लाभ होत असेल तरच याची मंजुरी दिली जाईल, असेही महावितरणने स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देग्राहकांचे हित लक्षात घेऊन करणार निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलतर्फे भागीदार (स्ट्रॅटेजिक पार्टनर) आणण्याच्या प्रयत्नाबाबत महावितरणने कडक भूमिका घेतली आहे. यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेण्यात येणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. जर ग्राहकांना याचा लाभ होत असेल तरच याची मंजुरी दिली जाईल, असेही महावितरणने स्पष्ट केले आहे.महावितरणने निदेशक परिचालन दिनेशचंद्र साबू यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले की, ‘एसएनडीएलला संचालित करणारी कंपनी एस्सेल युटिलिटीचे अध्यक्ष कमल माहेश्वरी यांनी तोंडी माहिती देत सांगितले की, कंपनी भागीदार (स्ट्रॅटेजिक पार्टनर) नियुक्त करीत आहे. महावितरणने यावर त्यांच्याकडून लेखी प्रस्ताव मागितला आहे. साबू यांनी स्पष्ट केले आहे की, हा धोरणात्मक निर्णय असेल. बोर्ड मिटिंगमध्ये यासंदर्भात सदर प्रस्तावावर चर्चा केल्यानंतर तो ऊर्जा मंत्रालयाकडे पाठवला जाईल. यापूर्वी २०११ मध्ये फ्रेन्चाईजी घेणारी कंपनी स्पॅन्कोशी झालेल्या कराराचा अभ्यास करून कायदेशीर सल्ला घेतला जाईल.विशेष म्हणजे एसएनडीएलची आर्थिक स्थिती चांगली नाही. सध्या कंपनीवर महावितरणचे ११४ कोटी रुपये थकीत आहेत. यापैकी दिलेले २१ कोटी रुपयेसुद्धा वादातीत आहे. १०० कोटी रुपयांची बँक गॅरंटी महावितरणकडे सुरक्षित आहे. कंपनीवर ठेकेदारांचेही थकीत आहे. अशा परिस्थितीत एसएनडीएल आर्थिक स्थिती मजबूत करणे आणि वितरण प्रणाली सशक्त करण्याच्या नावाखाली स्ट्रॅटेजिक पार्टनर आणण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी त्यांची इंडिया पॉवर सोबतची चर्चा जवळपास निश्चित झाली आहे.सूत्रांनी मात्र कोलकाता इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी आणि इतर एका इक्विटी कंपनीसोबतही चर्चा सुरु असल्याचा दावा केला आहे. एसएनडीएलचा दावा आहे की, दोन्ही कंपन्या सोबत काम करतील. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही कंपन्या केवळ सहा महिने सोबत राहतील. त्यानंतर पूर्ण कारभार नवीन कंपनीला सोपविला जाईल.२०१२ मध्ये सांभाळले होते काममहावितरणने दीर्घ चर्चेनंतर १ मे २०११ रोजी शहरातील तीन डिव्हीजनमधील वीज वितरण प्रणाली स्पॅन्कोच्या हाती सोपवली होती. स्पॅन्को ही जबाबदारी सांभाळू शकली नाही. त्यांनी एस्सेल समूहाची कंपनी एस्सेल युटिलिटीला आपली भागीदारी विकली. सप्टेंबर २०१२ मध्ये एस्सेल युटिलिटीने एसएनडीएलच्या नावाने शहरातील कामकाज सांभाळले.एसएनडीएलचे कर्मचारी दुविधेतया घटनाक्रमामुळे एसएनडीएलमधील कर्मचारी दुविधेत सापडले आहेत. तसेही कंपनीतील अनेक अधिकाऱ्यांकडून परफॉर्मेंस लिंक्ड इन्सेटिव्ह परत घेण्यात आलेले आहे. ही रक्कम तीन भागात परत घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु यावर बरेच वादळ उठल्याने पगरातून पहिली किस्त कापण्यात आली नाही. मात्र ती रक्कम अ‍ॅडव्हान्स म्हणून दाखवण्यात आलेली आहे. त्यामुळे कंपनीमधील कर्मचारी आपल्या भविष्याबाबत दुविधेत आहेत.

टॅग्स :mahavitaranमहावितरणnagpurनागपूर