शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला; जाणून घ्या किती षटकांचा होणार सामना     
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

महावितरण नागपूर परिक्षेत्रातील ५२ कर्मचाऱ्यांना दाखविणार घरचा रस्ता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 8:52 PM

विनापरवानगी सातत्याने कामावर गैरहजर असणाऱ्या नागपूर परिक्षेत्रातील तब्बल ५२ कर्मचाऱ्यांवर महावितरणने कामावरून कमी करण्याची प्रक्रिया सुरू केली असून कामात दिरंगाई करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिला आहे.

ठळक मुद्देभालचंद्र खंडाईत : विनापरवानगी सातत्याने गैरहजर राहणे भोवले

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विनापरवानगी सातत्याने कामावर गैरहजर असणाऱ्या नागपूर परिक्षेत्रातील तब्बल ५२ कर्मचाऱ्यांवर महावितरणने कामावरून कमी करण्याची प्रक्रिया सुरू केली असून कामात दिरंगाई करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिला आहे.महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या पाचही परिमंडळातील मानव संसाधन विभागाच्या आढावा बैठकीप्रसंगी कामावर सातत्याने गैरहजर असणाऱ्या विदर्भातील ५२ कर्मचाऱ्यांवर तात्काळ कामावरून कमी करण्याचे आदेश प्रादेशिक संचालक यांनी दिले. या कर्मचाऱ्यांमध्ये अकोला परिमंडलातील चार, अमरावती आणि चंद्रपूर परिमंडलातील प्रत्येकी १०, गोंदिया परिमंडलातील ११ तर नागपूर परिमंडळातील १७ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये वर्ग १ ते ४ मधील अधिकारी, अभियंते आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.शिस्तभंगाचा आरोप असलेल्या कर्मचाऱ्यांवर सहा महिन्यांत सुनावणी घेत यथोचित कारवाई पूर्ण करण्याच्या सूचना देतानाच अशी प्रकरणे प्रलंबित ठेवणाऱ्यांविरोधातही कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.या बैठकीला नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता रफीक शेख यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी महावितरणच्या मानव संसाधन विभागाचे महाव्यवस्थापक वैभव थोरात, सहायक महाव्यवस्थापक पांडुरंग वेळापुरे, रूपेश देशमुख, असित ढाकणेकर, शशिकांत पाटील व महेश बुरंगे यांच्यासह वरिष्ठ व्यवस्थापक व व्यवस्थापक स्तरावरील अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :mahavitaranमहावितरणnagpurनागपूर