ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडीचे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आंदोलन
By मंगेश व्यवहारे | Updated: December 16, 2024 11:28 IST2024-12-16T11:27:22+5:302024-12-16T11:28:32+5:30
Nagpur : विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात विधिमंडळाच्या पायऱ्यावर घोषणाबाजी

Mahavikas Aghadi protests against EVMs on the first day of the convention
मंगेश व्यवहारे
नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात विधिमंडळाच्या पायऱ्यावर इव्हिएम विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी नाना पटोले, अंबादास दानवे, सचिन अहिर, महेश सावंत, विजय वाडेट्टीवर, अनिल चौधरी, अभिजित वंजारी, नितीन राऊत, विकास ठाकरे, संजय मेश्राम, आमदार अभ्यंकर, वरूण सरदेसाई, अमित देशमुख आदीसह विरोधी पक्षाच्या आमदारांनी इव्हिएम हटावचे नारे देत सरकारचे लक्ष वेधले. संविधान वाचवा, इव्हिएम हटवा, घटना वाचवा, इव्हिएम सरकार हाय- हाय, अशी घोषणाबाजी केली.