शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधारी आघाडीने गमावल्या २ जागा; विधान परिषदेत भाजपची बाजी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 06:00 IST

Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या निवडणुकीत विदर्भातील दोन्ही जागा जिंकून भाजपने सत्ताधारी महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला.

नागपूर/अकोला : विधान परिषदेच्या निवडणुकीत विदर्भातील दोन्ही जागा जिंकून भाजपने सत्ताधारी महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला. नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसने मतदानाच्या आदल्या दिवशी पाठिंबा दिलेले मंगेश देशमुख यांचा पराभव केला. अकोला-वाशिम-बुलडाणा मतदारसंघाची जागा तीन वेळा जिंकणाऱ्या शिवसेनेच्या गोपीकिशन बाजोरिया यांचाही भाजपच्या वसंत खंडेलवाल यांनी पराभव  केला. विदर्भातील या दोन्ही जागांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. महाविकास आघाडीचे घटकपक्ष व भाजपमध्ये या जागांवर तडजोड होऊ शकली नव्हती. ५५९ पैकी ३२५ हक्काची मते असल्याने नागपूरमध्ये भाजपपुढे मोठे आव्हान नव्हते. काँग्रेसने भाजप सोडून पक्षात आलेले रवींद्र उर्फ छोटू भोयर यांना उमेदवारी दिली होती.  परंतु भोयर फार प्रयत्नच केले नाहीत. त्यामुळे मतदानाच्या आदल्या सायंकाळी पक्षाने अपक्ष मंगेश देशमुख यांना पाठिंबा दिला. बावनकुळे यांना पहिल्या पसंतीची ३६२ तर देशमुख यांना अवघी १८६ मते मिळाली. भोयर यांना त्यांचेच एक मत मिळाले तर पाच मते अवैध ठरली.७२ मते फुटलीअकोला-वाशिम-बुलडाणा मतदारसंघात आघाडीकडे बहुमताचे ४०६ असे संख्याबळ होते. मात्र, आघाडीची ७२ मते फुटली. त्यामुळे बाजोरिया यांचा १०९ मतांच्या फरकाने पराभव झाला. खंडेलवाल यांना ४४३ तर बाजोरिया यांना ३३४ मते मिळाली. ३१ मते अवैध ठरली. वंचित बहुजन आघाडीचे मतदार भाजपकडे झुकल्याचे दिसले.अमरावतीनंतर अकोल्यातही झाला पराभवमहाविकास आघाडीत गेल्यापासून राजकीयदृष्ट्या शिवसेनेचे नुकसान झाल्याच्या दाव्याला अकोल्यातील मंगळवारच्या पराभवाने पुष्टी मिळाली आहे. भारतीय जनता पक्षासोबत असताना तीनवेळा जिंकलेली ही जागा महाविकास आघाडीसोबत लढत शिवसेनेने गमावली.अमरावती शिक्षक मतदारसंघात श्रीकांत देशपांडे (शिवसेना) हे महाविकास आघाडीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार होते. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार रिंगणात नव्हते. तरीही देशपांडे यांच्या पाठीशी हे दोन्ही पक्ष ठामपणे उभे असल्याचे दिसले नव्हते. अपक्ष किरण सरनाईक विजयी झाले. शिवसेनेची जागा गेली. अकोल्यामध्येही तेच झाले. भाजपच्या साथीने तीन वेळा जिंकलेली ही जागा शिवसेनेला महाविकास आघाडीत लढताना मात्र गमावावी लागली.नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसला संधी दिली गेली. अंतापूरकर यांचे पुत्र जितेश अंतापूरकर जिंकले. २०१९ च्या निवडणुकीत रावसाहेब अंतापूरकर यांनी शिवसेनेचे सुभाष साबणे यांचा पराभव केला होता. तेच साबणे यावेळी भाजपतर्फे लढले व ३७ हजार मतांनी हरले पण त्यांनी ६७ हजारावर मते घेतली. भाजप त्या मतदारसंघात क्रमांक दोनचा पक्ष म्हणून प्रस्थापित झाला आणि शिवसेनेचे नुकसान झाले असे म्हणता येईल.उत्तर कोल्हापूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे अलिकडेच निधन झाले. २०१९ मध्ये त्यांनी शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांचा १५,१९९ मतांनी पराभव केला होता. आता पोटनिवडणुकीत ‘सिटिंग गेटिंग’ फॉर्म्युल्यानुसार ही जागा काँग्रेसच्या वाट्याला जाईल. भाजप ही निवडणूक लढवेल. गेल्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेली शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात नसेल.

शिवसेनेचे नुकसान, भाजपचा फायदास्थानिक स्वराज्य संस्थांमधून सहापैकी चार जागा भाजपने जिंकल्या. मुंबई, धुळे-नंदुरबार, नागपूर आणि अकोल्यात कमळ फुलले. कोल्हापूरची जागा काँग्रेसने तर मुंबईची एक जागा शिवसेनेने जिंकली. या आधी या सहामध्ये भाजप २, शिवसेना ३ आणि काँग्रेस १ असे चित्र होते. शिवसेनेचे दोन जागांचे नुकसान झाले. भाजपला दोन जागांचा फायदा झाला.

  • महाविकास आघाडीत ‘एक अधिक एक अधिक एक बरोबर तीन’ असे होताना दिसत नाही. पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीला, अमरावती व अकोल्यात शिवसेनेला त्याचा अनुभव आला. 
  • तीन पक्ष राज्यात सत्तेत एकत्र आहेत, पण निवडणुकीत तिघांची मते एकमेकांकडे वळताना दिसत नाहीत. हा निवडणुकीच्या दृष्टीने डोकेदुखीचा विषय ठरत आहे.
टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी