शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

भारतीयांच्या एकजुटीविषयी गांधीजींचे निरीक्षण ही इंग्रजांची उलटीपट्टी! : सरसंघचालक मोहन भागवत

By निशांत वानखेडे | Updated: November 29, 2025 20:28 IST

राष्ट्रीय पुस्तक महोत्सवातील मुलाखतीत काय म्हणाले मोहन भागवत...?

नागपूर : ‘ब्रिटिश येण्यापूर्वी भारतीय एकजूट नव्हते’, असे ‘हिंद स्वराज’ या पुस्तकात नमूद असलेले महात्मा गांधी यांचे निरीक्षण हे इंग्रजांनी शिकवलेली उलटीपट्टी आहे असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. माेहन भागवत यांनी येथे व्यक्त केलें.नागपूरच्या रेशीमबाग येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय पुस्तक महोत्सवात शनिवारी बोलताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी ‘राष्ट्र’ आणि ‘नेशन’ या संकल्पनांवर मत मांडले. ते म्हणाले, भारत नेहमीच ‘राष्ट्र’ राहिला आहे. विविध राज्यकर्त्यांच्या शासनात आणि परकीय राजवटीतसुद्धा आपला देश एक राष्ट्र म्हणून अस्तित्वात हाेते. त्यामुळे ब्रिटिशांच्या आगमनानंतर भारत राष्ट्र म्हणून एकजूट नव्हते, हे गांधीजींचे निरीक्षणच इंग्रजांनी दिलेल्या शिक्षणाच्या उलटीपट्टीचे आहे, असे मत त्यांनी मांडले.डॉ. भागवत पुढे म्हणाले, ‘नेशन’ ही संकल्पना इंग्रजांनी आपल्यावर लादली आणि आपणही तेच शब्द वापरू लागलो. मात्र ‘राष्ट्र’ हे केवळ नॅशनलिझम नसून ‘राष्ट्रत्व’, ‘राष्ट्रभाव’ आहे. पाश्चिमात्य अतिराष्ट्रवाद अहंकाराचे प्रतीक आहे व त्यामुळेच दोन महायुद्धे झाली. भारतीय राष्ट्रभाव एकतेतून जन्माला आला आहे. भारतात ‘वसुधैव कुटुंबकम्’ आणि ‘परोपकार’ ही भावना मुळापासून आहे. धर्म, भाषा, आहार, परंपरा आणि प्रांत असे विविध भेद असले तरी आपण सर्वजण भारतमातेची मुले आहोत, ही एकता आपल्याला जोडून ठेवते. देशात विविधता असूनही आपला संस्कार एकतेचा आहे, हेच राष्ट्रत्व आहे, असे डाॅ. भागवत म्हणाले.वाद करणे, संघर्ष करणे हा आपल्या देशाचा स्वभाव नाही. परंपरेपासून आपल्याकडे परस्पर मैत्री, सहकार्य आणि एकत्र चालण्याची संस्कृती आहे. परदेशातील परिस्थिती भिन्न आहे. तेथील राष्ट्रनिर्मितीत संघर्ष, संघर्षातून आलेली आक्रमकता आणि वर्चस्वाचा भाव दिसतो. त्यामुळेच त्यांच्या ‘नेशन’ आणि आपल्या ‘राष्ट्र’ या दोन्ही संकल्पना अगदी वेगळ्या आहेत. आपले ‘राष्ट्र’ प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. ते सत्ता, सीमारेषा किंवा राजकीय व्यवस्था यांवर आधारित नसून, संस्कार, एकता आणि परोपकाराच्या भावनेवर उभे आहे. ‘जेन-झी’च्या लेखकांनी ‘नेशन’चे भाषांतर ‘राष्ट्र’ असे केल्यास त्यातील भावार्थ हरवू शकतो. साहित्यात चुकीच्या शब्दप्रयोगांमुळे गोंधळ निर्माण हाेऊ शकताे आणि संस्कृतीवर परिणाम करू शकताे. लेखकांनी मुळांचा अभ्यास करून अनुभवावर आधारित लेखन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Gandhi's view in 'Hind Swaraj' wrong: Mohan Bhagwat criticizes

Web Summary : Mohan Bhagwat criticized Mahatma Gandhi's observation in 'Hind Swaraj' that India wasn't united before the British, calling it a product of colonial education. He emphasized India's historical unity and distinguished 'Rashtra' from the Western concept of 'Nation', highlighting Indian values of unity and cooperation.
टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतnagpurनागपूरMahatma Gandhiमहात्मा गांधी