Maharashtra Winter Session 2022: शाईफेक घटनेनंतर सरकार अलर्ट; विधिमंडळात शाईपेन नेण्यावर बंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 11:29 IST2022-12-19T11:29:43+5:302022-12-19T11:29:56+5:30
आज पहिल्या दिवशी येथे येणाऱ्या सर्व व्यक्तीचे पेन तपासण्यात आले. त्यामुळे सरकारने शाई प्रकरणाचा चांगलाच धसका घेतल्याचे चित्र आहे.

Maharashtra Winter Session 2022: शाईफेक घटनेनंतर सरकार अलर्ट; विधिमंडळात शाईपेन नेण्यावर बंदी
नागपूर - पुणे येथील घडलेल्या घटनेनंतर शाई सुरक्षा यंत्रणेच्या रडारवर आहे. विधिमंडळात ही शाई पेनावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. आज पहिल्या दिवशी विधिमंळात येणाऱ्या सर्व व्यक्तीचे पेन तपासण्यात आले. शाईचे पेन नेण्यास बंदी घालण्यात आली.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्राकांत पाटील यांनी महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. राज्यभर याचे पडसाद उमटले. पुणे येथे समता सैनिक दलाच्या सैनिकांना चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक केली. या प्रकरणी दोन लोकांसह एक पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर एका ठिकणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एका कार्यक्रमात पत्रकारांचे पेन तपासण्यात आले. विधिमंडळाच्या अधिवेशनातही याचे पडसाद दिसून आले.
आज पहिल्या दिवशी येथे येणाऱ्या सर्व व्यक्तीचे पेन तपासण्यात आले. त्यामुळे सरकारने शाई प्रकरणाचा चांगलाच धसका घेतल्याचे चित्र आहे. याबाबत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले की, सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्याकडून कारवाई होत आहे.