शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राचे एक थेंबही पाणी गुजरातला देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 23:04 IST

नदीजोड प्रकल्पांतर्गत साकारण्यात येत असलेल्या प्रकल्पांमधून महाराष्ट्र आपल्या कोट्यातील एक थेंबही पाणी गुजरातला देणार नाही, अशी घोषणा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी विधानसभेत केली.

ठळक मुद्देनदीजोड प्रकल्पावर राज्य सरकारची घोषणा : विधानसभेत गदारोळ

आॅनलाईन लोकमतनागपूर : नदीजोड प्रकल्पांतर्गत साकारण्यात येत असलेल्या प्रकल्पांमधून महाराष्ट्र आपल्या कोट्यातील एक थेंबही पाणी गुजरातला देणार नाही, अशी घोषणा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी विधानसभेत केली. प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून; यामुळे मुंबईपासून मराठवाड्यापर्यंतची पाण्याची कमतरता दूर होईल, त्यामुळे यावर कुणी राजकारण करू नये, असेही त्यांनी सांगितले. परंतु या उत्तराने विरोधी पक्षाचे समाधान झाले नाही. विरोधक या विषयावर आक्रमक होते. गदारोळ वाढल्याने सभागृहाचे कामकाज १० मिनिटासाठी स्थगित करावे लागले.अतुल भातखळकर, अजित पवार आदींनी प्रश्नोत्तराच्या तासात राज्यातील दमणगंगा-पिंजाळ व पार-तापी-नर्मदा नदीजोड प्रकल्पाच्या वस्तुस्थितीची माहिती मागत महाराष्ट्राचे पाणी गुजरातला दिले जात असल्याचा आरोप केला. यावर उत्तर देताना गिरीश महाजन यांनी सांगितले की, २७४६.६१ कोटी रुपयाच्या या प्रकल्पात महाराष्ट्र आणि गुजरातची हिस्सेदारी आहे. पाण्याच्या वाटपात सहमती झाल्यावर केंद्र महाराष्ट्र आणि गुजरात सरकार यांच्यात सामंजस्य करार केला जाईल.विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यात करार झाला होता. या करारात महाराष्ट्राच्या हिताबाबत कुठलीही तडजोड करण्यात आली नव्हती. आता याचे पाणी गुजरातला देण्यात येत असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी शंका उपस्थित केली की, महाराष्ट्र सरकार कदाचित पक्षासमोर लोटांगण घालेल; कारण त्यांना गुजरातबाबत विशेष प्रेम आहे.

४३२ घन लाख मीटर पाणी घेता येणार नाहीयावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्र केवळ ४३२ घन लाख मीटर पाणी घेऊ शकणार नाही. हे पाणी भौगोलिकदृष्ट्या उंचीवर आहे. त्याला महाराष्ट्रात आणणे शक्य नाही. परंतु विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि अजित पवार यांनी यावर आक्षेप घेत सौरऊर्जेवर आधारित प्रकल्पाद्वारे हे पाणी महाराष्ट्रात आणण्याची सूचना केली.

 

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७Girish Mahajanगिरीश महाजन