शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

तोकडे कपडे घालून देवदर्शनाला आलात, तर...; महाराष्ट्र मंदिर महासंघाने शोधला मध्यममार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 18:38 IST

आजपासून नागपूर येथील चार मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंदिर महासंघाने घेतला आहे.

नागपूर : आजपासून नागपूर येथील चार मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंदिर महासंघाने घेतला आहे. पहिल्या महिन्यात राज्यभरातील ३०० पेक्षा जास्त मंदिरांमध्ये हा नियम लागू करावा यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती मंदिर महासंघाने दिली. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी तोकडे, अंगप्रदर्शन करणारी अथवा उत्तेजक कपडे परिधान केल्यास त्यांना दर्शन घेता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मंदिर महासंघाने पत्रकार परिषदेतून मांडली. 

अंगप्रदर्शन करणारी वस्त्रे घालणाऱ्यांना प्रवेश देऊन नये, असा निर्णय नागपूर येथील चार मंदिराच्या विश्वस्तांनी घेतला आहे. खरं तर या आधी तुळजापूर मंदिर समितीने देखील असा निर्णय घेतला होता. पण काही तासांतच समितीला हा निर्णय मागे घ्यावा लागला. पण नागपूरच्या चार मंदिरामध्ये आजपासून हा नियम लागू करण्यात आला आहे. पाश्चिमात्य कपडे असतील तर त्याला सरसकट विरोध नाही. तसेच पॅंट शर्ट घालून आलेल्यांना देखील विरोध नसेल पण फॅशन करणाऱ्यांना प्रवेश नाकारला जाईल असं महासंघाने स्पष्ट केलं. 

 नागपुरातील ४ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू नागपुरातील चार मंदिरांमध्ये आजपासून वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. यामध्ये गोपाळ कृष्ण मंदिर, धनतोली, संकटमोचन पंचमुख हनुमान मंदिर, बेलोरी, बृहस्पती मंदिर, कोन्होलीबारा आणि दुर्गामाता मंदिर हिलटॉप या मंदिरांचा समावेश आहे. लक्षणीय बाब म्हणजे जे भाविक अंगप्रदर्शन करणारे कपडे परिधान करून येतील त्यांना मंदिर समितीकडून ओढणी अथवा अंग झाकता येईल, असं वस्त्र दिलं जाईल. महाराष्ट्र सरकारच्या कार्यालयात वस्त्रसहिता आहे, तर मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी का नाही असा प्रश्न देखील महाराष्ट्र मंदिर महासंघाने उपस्थित केला. 

नागपुरातील चार मंदिरामध्ये वस्त्रसंहिता लागू केल्यानंतर समितीने भाविकांसाठी पोस्टर लावले आहे. "अंगप्रदर्शक, उत्तेजक, असभ्य, अशोभनीय व तोकडे वस्त्र तसेच असात्विक वेशभूषा करून मंदिरात प्रवेश करू नये. भारतीय संस्कृतीचे पालन करून सात्विक वेशभूषेतच दर्शन घ्यावे", अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले आहे. 

 

टॅग्स :nagpurनागपूरTempleमंदिर