शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस
2
एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?
3
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
4
अमेरिकेकडून भारतावर लावलेलं टॅरिफ हटवण्याची मागणी; शुल्काला थेट आव्हान, खासदारांनी संसदेत मांडला प्रस्ताव
5
Crime: "मला प्रेग्नंट कर नाही तर,..." हे ऐकताच प्रियकर भडकला; विवाहित प्रेयसीला कायमचं संपवलं
6
Food: भेसळयुक्त पनीर कसे ओळखाल? फक्त ४ मिनिटात घरी 'या' ४ सोप्या चाचण्या करून पाहा!
7
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
8
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
9
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
10
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
11
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
12
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
13
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
14
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
15
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
16
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
17
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
18
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
19
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे

By यदू जोशी | Updated: December 13, 2025 09:02 IST

कोणाला किती जागा? महापौर कोणाचा असेल?अन्य पदांच्या वाटपाचाही तिढा

यदु जोशी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात आगामी महापालिका निवडणुकीत युती करण्यासंदर्भात जी चर्चा झाली त्यात वादाचे अनेक मुद्दे समोर आले आणि त्यावर तोडगा निघू शकला नाही, असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. परस्परात अनेक ठिकाणी संघर्ष असून, जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करणे कठीण झाले आहे.

विनम्रता, निष्कलंक समर्पण आणि मूर्तिमंत सौजन्य

युतीमध्ये आमदारकीला सिटिंग-गेटिंग म्हणजे वॉर्डात आधीच्या निवडणुकीत ज्याचा आमदार जिंकला ती जागा त्याला असा फॉर्म्युला आहे. मात्र, महापालिकांच्या प्रभागांत हा फॉर्म्युला अंमलात आणण्यात अनेक अडचणी आहेत. यापूर्वी सातआठ वर्षांपूर्वी महापालिका निवडणूक झाली तेव्हा शिवसेना एकत्र होती. आजही त्यातील जे नगरसेवक उद्धवसेनेतच आहेत त्या जागा शिंदेसेनेला देण्यास भाजपचा विरोध असल्याचे म्हटले जाते. गेल्या सातआठ वर्षांत अनेक पक्षांतरे झाली व त्या आधारे ‘सिटिंग-गेटिंग’चा फॉर्म्युला अंतिम करण्यात दोघांचा एकमेकांना विरोध आहे.

पदांच्या वाटपाचाही तिढा सुटेना

निवडणुकीनंतर पदांचे वाटप (जसे महापौर, स्थायी समिती आणि इतर समित्यांचे अध्यक्ष) करायचे की निवडणुकीच्या आधीच ते निश्चित करायचे हा कळीचा मुद्दा बनला आहे. युतीबाबत काही अशांत टापू आहेत आणि तिथे दोन पक्षांत सामंजस्य निर्माण करणे सर्वात आव्हानात्मक आहे. एकनाथ शिंदे यांचा गड मानल्या जाणाऱ्या ठाणे शहरात शिंदेच्या नेतृत्वातच गेल्यावेळी शिवसेनेची सत्ता आली होती, यावेळी तेथील शिंदेसेनेला वाटेकरी नको आहे.

१३१ नगरसेवकांच्या या महापालिकेत भाजपला किमान ५५ ते ६० जागा हव्या असल्याची माहिती असून, शिंदेसेनेची त्यासाठी तयारी नाही. गेल्यावेळच्या निवडणुकीत कल्याण-डोंबिवलीत त्यावेळी राज्यात सत्तेत असलेल्या भाजप-शिवसेनेत प्रचंड संघर्ष झाला होता. ‘आम्ही शिवसेनेचे मंत्री खिश्यात राजीनामे घेऊनच फिरतो, असे शिंदे म्हणाले होते’, तर  ‘वाघाच्या जबड्यात घालुनी हात मोजतो दात’ हे देवेंद्र फडणवीस यांचे वाक्य गाजले होते. आता तर स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि तिथे भाजप विरुद्ध शिंदेसेना हा टोकाचा वाद आहे. मीरा-भाईंदर, उल्हासनगरमध्येही तीच स्थिती आहे.

१३ पालिकांमध्ये पेचप्रसंग

किमान १३ महापालिका अशा आहेत की, जिथे भाजप-शिंदेसेनेची युती झाली, तर दोन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी होईल. भाजपच्या वाट्याला गेलेल्या जागेवर शिंदेसेनेचे बंडखोर आव्हान देतील.

शिंदेसेनेला सुटलेल्या जागांवर भाजपमधून बंडखोरी होईल. तिसरा भिडू अजित पवार गटही युतीतच लढला, तर जागावाटपात प्रत्येकाचे समाधान करणे मुश्किल होणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra's Ruling Coalition Faces Seat-Sharing Challenges, Disputes Emerge Before Elections

Web Summary : Maharashtra's ruling coalition is struggling to finalize seat-sharing for upcoming municipal elections. Disagreements persist over applying the 'sitting-getting' formula due to past party defections. Power-sharing arrangements post-election and potential rebellions in 13 municipalities further complicate alliance talks, especially in Thane, Kalyan-Dombivli, and Mira-Bhayandar.
टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनMahayutiमहायुती