लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खूप प्रतीक्षेनंतर होणाऱ्या नगरपरिषदेच्या आणि नगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल अखेर रविवारी म्हणजेच आज लागत आहे. नागपूर जिल्ह्यातील १५ नगरपरिषदा व १२ नगरपंचायतींत कोण मैदान मारणार हे हळू हळू स्पष्ट होत आहे. काटोल नगर पालिकेच्या सर्व १२ प्रभागांचा निकाल स्पष्ट झाला असून नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) व शेकापच्या उमेदवार अर्चना देशमुख २३७६ मतांनी विजयी झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) व शेकापला १२ जागा तर भाजपच्या १३ जागा निवडून आल्या आहेत.
दरम्यान, शनिवारी कामठी, नरखेड, रामटेक नगरपरिषद आणि कोंढाळी नगरपंचायत क्षेत्रातील ९ प्रभागांसाठी शांततेत मतदान पार पाडले. न्यायालयीन अपिलानंतर येथील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. जिल्ह्यातील २७ स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी दि. २ डिसेंबरला ६१.२५ टक्के मतदान झाले होते. यात एकूण ७ लाख २९ हजार ८२२ मतदारांपैकी ४ लाख ४७ हजार ११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये २ लाख २८ हजार १८६ पुरुष, २ लाख १८ हजार ८२३ महिला व २ इतर मतदारांचा समावेश आहे. शनिवारी झालेल्या मतदानानंतर सरासरी मतदानांचा टक्का वाढला आहे. नगराध्यक्षपदांच्या २७ जागांसाठी १६७ उमेदवार रिंगणात होते.
Web Summary : Archana Deshmukh of NCP (Sharadchandra Pawar) and Shekap won Katol Nagar Palika president post by 2376 votes. NCP (Sharadchandra Pawar) and Shekap secured 12 seats, while BJP got 13 in the election. Elections for 27 local bodies saw 61.25% voter turnout.
Web Summary : राकांपा (शरदचंद्र पवार) और शेकाप की अर्चना देशमुख ने 2376 वोटों से काटोल नगर पालिका अध्यक्ष पद जीता। राकांपा (शरदचंद्र पवार) और शेकाप को 12 सीटें मिलीं, जबकि भाजपा को चुनाव में 13 सीटें मिलीं। 27 स्थानीय निकायों के चुनावों में 61.25% मतदान हुआ।