शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: ''मध्यावधी निवडणुका नाही, पाच वर्षे स्थिर सरकार देऊ''

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 06:29 IST

राज्यात कुठल्याही परिस्थितीत मध्यावधी निवडणुका होणार नाहीत.

नागपूर : राज्यात कुठल्याही परिस्थितीत मध्यावधी निवडणुका होणार नाहीत. पाच वर्षे स्थिर सरकार देण्याचाच आमचा प्रयत्न असेल व येणारे सरकार तकलादू नसेल, असे राष्ट्र वादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार स्पष्ट केले. मुस्लीम आरक्षण लागू करण्यासंदर्भात सरकार स्थापन झाल्यानंतर सर्व पक्ष मिळून एकत्रित भूमिका ठरवतील. धर्मनिरपक्षेतेशी तडजोड करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.विदर्भ दौऱ्यावर असलेले शरद पवार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात सरकार कधी स्थापन होईल हे आता सांगता येते नाही. काँग्रेसने प्रतिनिधी नेमले आहेत व राष्ट्रवादीच्या नेत्यांशी त्यांची चर्चा सुरू आहे. काँग्रेस व शिवसेना वगळता कुणाशीही आमची चर्चा सुरू नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री कोण असेल, असे विचारले असता, आताच कशाला ‘कार्ड’ खुले करू, एवढेच त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई मिळावी व सरसकट कर्जमाफी मिळावी, यासाठी प्रयत्न राहणार आहे. केंद्र या स्थितीबाबत किती गंभीर आहे ते माहिती नाही, पण शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी कृषी व वित्त मंत्रालयाशी चर्चा करू. तेथून दिलासा मिळाला नाही, तर थेट पंतप्रधान मोदींची भेट घेऊन, असे पवार यांनी सांगितले.सरसकट पंचनामे व्हावेतअवकाळी पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ३३ टक्क्यांहून जास्त नुकसान झालेल्या पीकजमिनींचे पंचनामे करण्यात येत आहेत. मात्र, हे मापदंड योग्य नसून यात बदल करण्याची गरज असून सरसकट पंचनामे झाले पाहिजे, अशी मागणी पवार यांनी केली.महिला मुख्यमंत्र्यांसंदर्भात विचार नाहीराष्ट्रवादी काँग्रेसचा अडीच वर्षे मुख्यमंत्री झाला, तर सुप्रिया सुळे यांचे नाव समोर येऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे, परंतु पवार यांनी अशी शक्यता खोडून काढली आहे. महिला मुख्यमंत्री झाली, तर आनंदच आहे. मात्र, या संदर्भात कुठलीही चर्चा किंवा प्रस्ताव नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवाय, शिवसेना-आघाडी सरकारचा मुख्यमंत्री कोण होणार, यावरही त्यांनी भाष्य टाळले.>शरद पवार म्हणाले, ‘मी पुन्हा येईन’तीन पक्षांचे सरकार टिकणार नाही व राज्यात भाजपचेच परत सरकार येईल, असा दावा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात येत आहे. यावर ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ इतकेच माझ्या डोक्यात असल्याचा चिमटा पवार यांनी काढला. फडणवीसांविषयी जेवढी माहिती आहे, त्यात ते ज्योतिषशास्त्राचेही अभ्यासक आहेत हे माहीत नव्हते, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस