शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

मध्य नागपुरात राडा, कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा ईव्हीएम असलेल्या कारवरच हल्ला

By योगेश पांडे | Updated: November 20, 2024 21:39 IST

भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने : परिसरात तणाव, पोलिसांची दमछाक

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : दिवसभर काही ना काही कारणाने तणावात असलेल्या नागपूर मध्य मतदारसंघात रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास चक्क अतिरिक्त ईव्हीएम मशीन असलेल्या निवडणूक आयोगाच्या कारवरच काही तरुणांनी हल्ला केला. संबंधित कारची तोडफोड करण्यात आली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिस विभागाकडून हल्ला करणारे तरुण काँग्रेस कार्यकर्ते होते व गैरसमजातून हा प्रकार घडल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

नागपूर मध्यमधील किल्ला परिसरातील बूथ क्रमांक २५८ च्या परिसरात सायंकाळी सात ते साडेसात दरम्यान ही घटना घडली. स्ट्रॉंगरूममध्ये ईव्हीएम घेऊन जाणारी एमएच ३१ सीपी ३२२९ ही गाडी मतदान केंद्राच्या बाहेर निघाली. त्यावेळी अचानक काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी ती गाडी थांबविली. त्यांनी शिवीगाळ करीत त्यावर हल्ला केला व तोडफोड केली. त्याचवेळी एमएच १९ बीयू ६०२७ ही गाडीदेखील निघाली. त्यात बसलेल्या कर्मचाऱ्यावरदेखील हल्ला करण्यात आला. तरुणांनी दगड व लोखंडी रॉड्सने कारची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. तातडीने पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले व कर्मचाऱ्यांना सुरक्षित जागेवर नेले. तोडफोड करण्यात आलेली गाडी कोतवाली पोलिस ठाण्यात नेण्यात आली, तर ईव्हीएमला दुसऱ्या वाहनातून रवाना करण्यात आले. ही बातमी पसरताच भाजप व काँग्रेस कार्यकर्ते जमा झाले. मात्र, पोलिसांनी सर्वांना तेथून पिटाळून लावले. यावेळी भाजपचे नागपूर मध्यमधील उमेदवार प्रवीण दटके हेदेखील आक्रमक झाले होते व पोलिसांनी कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली.

बंटी शेळकेंनी भाजप कार्यकर्त्यावर हल्ला केल्याचा आरोप

दरम्यान, भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये यानंतर मोठा राडा झाला. बंटी शेळके व त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यावर हल्ला केल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे शेळके यांच्याविरोधात तक्रार करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी कोतवाली पोलिस ठाण्यात पोहोचले होते. याबाबत पोलिस अधिकाऱ्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. या घटनेमुळे या परिसरात वाहतुकीची मोठी कोंडीदेखील निर्माण झाली होती.

गैरसमजातून झाला नागपूर मध्यमधील गोंधळ

दरम्यान, नागपूर मध्यमधील राडा हा गैरसमजातून झाल्याचे पोलिस विभागाकडून सांगण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रियेतील झोनल अधिकारी एक डॉक्युमेंट प्रिंट करण्यासाठी झेरॉक्स केंद्रावर गेला होता. त्यांच्याजवळ त्यावेळी अतिरिक्त ईव्हीएम मशीनदेखील होत्या. काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांच्या हे नजरेस पडले व त्यांनी ते ईव्हीएम मशीन स्वत:सोबत का नेत आहेत, असा सवाल उपस्थित करीत आक्रमक पवित्रा घेतला. यामुळे गैरसमज आणखी वाढला व त्यातूनच संतप्त कार्यकर्त्यांनी वाहनाची तोडफोड केली. यानंतर भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते पोलिस ठाण्यासमोर आमनेसामने आले. संबंधित झोनल अधिकारी मतदान केंद्रावर परतले असून, पॅकिंगची बाकी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या संपूर्ण प्रकारात ईव्हीएम मशीनचे कुठलेही नुकसान झालेले नाही, असे पोलिसांकडून अधिकृतपणे सांगण्यात आले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४nagpur-central-acनागपूर मध्यEVM Machineईव्हीएम मशीनPoliceपोलिस