शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

माझे घर नागपूरच, अद्याप मुंबईत स्वत:चे घर नाही; देवेंद्र फडणवीस यांची दक्षिण-पश्चिमच्या मतदारांना भावनिक साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 12:54 IST

Maharashtra Assembly Election 2024:  "कोणत्याही पदावर असलो, तरी दक्षिण-पश्चिमशी असलेली नाळ कधीही तुटू दिली नाही, कोणत्याही जातीपातीच्या माणसांची कामे केली आणि म्हणूनच सर्वांनी आजवर विश्वास टाकला", असे म्हणत त्यांनी यावेळी भरघोस मताधिक्याने विजयी करण्याचे मतदारांना आवाहन केले.

Devendra Fadnavis, Maharashtra Assembly Election 2024 : मी इतकी वर्षे आमदार आहे, मुख्यमंत्री होतो, आज उपमुख्यमंत्री आहे पण अजूनही माझे मुंबईत स्वत:चे घर नाही. दक्षिण-पश्चिम नागपूर हेच माझे घर आहे, अशी भावनिक साद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना घातली आणि सभेतील सगळ्यांनीच टाळ्यांचा कडकडाट केला. फडणवीस हे सहाव्यांदा या मतदारसंघातून लढत आहेत. चढत्या मताधिक्याने ते दरवेळी विजयी झाले आहेत. "कोणत्याही पदावर असलो, तरी दक्षिण-पश्चिमशी असलेली नाळ कधीही तुटू दिली नाही, कोणत्याही जातीपातीच्या माणसांची कामे केली आणि म्हणूनच सर्वांनी आजवर विश्वास टाकला", असे म्हणत त्यांनी यावेळी भरघोस मताधिक्याने विजयी करण्याचे मतदारांना आवाहन केले.

राज्याच्या विविध भागांमध्ये देवेंद्र फडणवीस हे सध्या प्रचारसभांसाठी फिरताना दिसत आहेत. भाजप व महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी त्यांचे विविध जिल्ह्यात दौरे सुरु आहेत. रविवारी त्यांनी नागपुरात आपल्या मतदारसंघात सभा घेतली. सभेला प्रचंड गर्दी झाली. त्यावेळी त्यांनी भावना व्यक्त केली. "माझी स्वत:ची कोणतीही संस्था नाही, कॉलेज नाही, मी नेहमीच लोकांचा विचार केला. इतके मुख्यमंत्री आजवर महाराष्ट्राने पाहिले पण मुंबईत स्वत:चे घर नसलेला मी एकच मुख्यमंत्री आहे," असे ते म्हणाले.

"नागपुरात आमचे नेते नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात २०१४ पासून या शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प आम्ही केला आणि यशस्वीही केला. मिहानमध्ये ८८ हजार जणांना रोजगार मिळाला, आता मोठी गुंतवणूक येऊ घातली असून आणखी एक लाख रोजगार मिळतील. सिमेंटचे रस्ते झाले, मेट्रो आली. नवीन विमानतळ येत आहे. ५०० कोटी रुपये खर्चून येथील वैद्यकीय महाविद्यालयांमधील सुविधा वाढविल्या. नागपुरात आयआयएम आले, एन.एम.कॉलेेज, सिम्बॉयसिससारख्या नामवंत शिक्षणसंस्था आल्या, आणखीही खूप काही करायचे आहे," असे म्हणत फडणवीस यांनी मतदारांचा आशीर्वाद मागितला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाElectionनिवडणूक 2024