शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

Maharashtra Assembly Election 2019 : चहा ७ रुपये, कॉफी १२ रुपये : उमेदवारांसाठी खर्चाचे दर निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 20:49 IST

निवडणूक विभागाने प्रचार साहित्यांसह कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा नाश्ता व जेवणाची दरसूची निश्चित केली आहे. यानुसार एक कप चहासाठी ७ रुपये तर कॉफीसाठी १२ रुपये निश्चित केले असून जेवणासाठी शाकाहारी थाळी १०० व तर मांसाहारी थाळीसाठी २०० रुपये निश्चित केले आहे.

ठळक मुद्देजेवणाची थाळी १०० व २०० रुपये

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. पदयात्रा, जाहीर सभा, रॅली व आणि लहान मोठ्या बैठकांचा (कॉर्नर मिटिंग) जोर वाढला आहे. यात चहा, नाश्त्यापासून तर जेवणाचीही व्यवस्था केली जात आहे. निवडणूक विभागाने प्रचार साहित्यांसह कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा नाश्ता व जेवणाची दरसूची निश्चित केली आहे. यानुसार एक कप चहासाठी ७ रुपये तर कॉफीसाठी १२ रुपये निश्चित केले असून जेवणासाठी शाकाहारी थाळी १०० व तर मांसाहारी थाळीसाठी २०० रुपये निश्चित केले आहे. जेवणाचा खर्च बहेर कितीही असला तरी निवडणूक आयोगाकडे मात्र हाच दर नोंदवण्यात येणार आहे.येत्या २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील १२ विधानसभा क्षेत्रातील राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांच्या प्रचार खर्चासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दरसूची तयार केली होती. निवडणुकीकरिता उमेदवारास खर्चाची मर्यादा जवळपास २८ लक्ष रुपये इतकी आहे. त्यावर राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर निश्चित करण्यात आली आहे. यात उमेदवार किंवा त्यांचे कार्यकर्त्यांद्वारे वापरण्यात येणाऱ्या प्रचार व प्रसिद्धीच्या साहित्याचे दर ठरवण्यात आले आहेत. उमेदवारांकडून वापर करण्यात येणाऱ्या साहित्याची नोंद ठेवून त्यांच्या खर्चाची नोंद प्रशासनामार्फत ठेवली जाणार आहे. प्रचाराची यंत्रणा, हॉटेल व लॉजचे भाडे, इतर साहित्य, स्टेशनरी, नाश्ता व जेवण, वाहनांच्या वापरावर होणाऱ्या खर्चाचे निकष ठरवण्यात आले आहेत. एकवेळच्या शाकाहारी भोजनासाठी १०० रुपये तर मांसाहारी भोजनासाठी २०० रुपये प्रति व्यक्ती इतके दर निश्चित करण्यात आले आहे. लस्सीसाठी २० रुपये, कोल्ड ड्रींककरिता २०, स्नॅक्सकरिता २५ रुपये मोजावे लागतील. राजकीय पक्षाच्या प्रचार सभेत, रॅलीत किंवा 'कॉर्नर मिटींग'ला शेकडो, हजारो लोक उपस्थित राहतात. या सर्वांची व्यवस्था करावी लागते. परंतु उमेदवार प्रत्यक्षात किती लोक दर्शवितात, यावर सर्व काही अवलंबन आहे.असे आहेत साहित्य व त्याचे दरप्रकार प्रती नग/दिवस दर

  • संदल २४०० रुपये
  • टी-शर्ट ६५ रुपये
  • दरी २४ रुपये प्रती दिवस
  • बेडशीट १० रुपये प्रती दिवस
  • गांधी टोपी ४.८० रुपये
  • दुपट्टा ४ रुपये
  • गादी ७ रुपये प्रती दिवस
  • टेबल ६.७६ प्रती दिवस
टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nagpurनागपूर