शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

Maharashtra Assembly Election 2019 : छाननीत धक्का : २८ उमेदवारांचे अर्ज रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 22:12 IST

नागपूर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघात एकूण २०५ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केले होते. त्यापैकी छाननीमध्ये एकूण २८ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले.

ठळक मुद्दे१७८ उमेदवार रिंगणात : सोमवारी उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघात एकूण २०५ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केले होते. त्यापैकी छाननीमध्ये एकूण २८ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. यात राजकीय पक्षांतील उमेदवारांचाही समावेश आहे. नागपूर पश्चिम मतदार संघातून सर्वाधिक ५ उमेदवारांचे अर्ज रद्द झाले असून येथे आता वंचित बहुजन आगाडीचा उमेदवार रिंगणात नसेल. सोमवार ७ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा निवडणुकीच्या रिंगणात नेमके किती उमेदवार शिल्लक राहतात, याचे चित्र स्पष्ट होईल.अर्जाच्या छाननीनंतर शनिवारी १७८ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली. तर २८ अवैध ठरली. यात यात सर्वाधिक नागपूर पश्चिम मतदार संघातील ६ उमेदवार अर्ज अवैध ठरल्याने निवडणुकीच्या रिंंगणातून बाद झाले. त्यानंतर नागपूर दक्षिण पश्चिम, हिंगणा, सावनेर, कामठी आणि उत्तर नागपूर विधानसभेतून प्रत्येकी ३ उमेदवारांचे अर्ज रद्द झाले. तर रामटेक, उमरेड व काटोल मतदार संघातील प्रत्येकी दोन उमेदवार आणि नागपूर दक्षिण मतदार संघातील एका उमेवाराचा अर्ज अवैध ठरला. पूर्व आणि मध्य नागपुरातील एकाही उमेदवाराचा अर्ज अवैध ठरला नाही, हे विशेष.छाननीत बाद झालेले उमेदवारनागपूर दक्षिण-पश्चिम : राकेश महेश गजभिये (बसपा) , विलास श्रीराम सुर्यवंशी (अपक्ष), सर्वजित ताराचंद चहांदे (अपक्ष)नागपूर दक्षिण : नरेंद्र यशवंत अतकर (अपक्ष)नागपूर उत्तर : पराग भाऊराव जंगम (अपक्ष), जितेंद्र भस्कर घोडेस्वार (बसपा), बुद्धम बाबुराव राऊत (बसपा)नागपूर पश्चिम : सोनू प्रभाकर चहांदे ( वंचित बहुजन आघाडी), मनोज भीमराव गजभिये (बसपा), उमेश नामदेवराव टेकाम (गोंडवाना गणतंत्र पार्टी), साहिल बालचंद्र तुरकर (भारतीय मानवाधिकार फेडरल पार्टी), इलियास गुलजार खान (एमपीडी), विक्रांत चंद्रकांत ओगले (अपक्ष)

उमरेडमध्ये दोघांचे अर्ज अवैध उमरेड विधानसभा मतदार संघात शनिवारी छाननी अंती दोन अर्ज अवैध ठरले. यामध्ये स्वप्निल जामसुगंध खोब्रागडे आणि जॉनी शलिकराम मेश्राम यांचा समावेश आहे. खोब्रागडे यांनी भाजप पक्षाचा उल्लेख करीत अर्ज सादर केला होता. उमेदवारी अर्ज सादर करताना त्यांनी पक्षाचा एबी फार्म जोडलेला नव्हता. सोबत १० प्रस्तावक दिले नाहीत यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरला. जॉनी मेश्राम यांनीही १० प्रस्तावक दिले नाही. मूळ निवासी पत्ता असलेले दस्तऐवज जोडले नाहीत. दोन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याने आता छाननीअंती १५ उमेदवार रिंगणात आहेत. 

सावनेरमध्ये तिघांचे अर्ज अवैध सावनेर विधानसभा मतदार संघात १३ उमेदवारांनी १६ नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. यातील तीन उमेदवारांचे अर्ज तांत्रिक कारणामुळे अवैध ठरले. त्यामुळे सध्या येथे निवडणूक रिंगणात १३ उमेदवार आहेत. शनिवारी उमेदवारी अर्ज रद्द झालेल्यात अनुजा सुनील केदार (कॉँग्रेस) आणि सोनबा मुसळे (भाजप), अनिल बोडाखे (बहुजन मुक्ती पार्टी) यांचा समावेश आहे. या तिघांनी त्यांच्या पक्षाकडून डमी उमेदवार म्हणून अर्ज केले होते. त्यांच्या अर्जासोबत पक्षाचे अधिकृत ‘बी’फार्म नसल्याने त्यांचे अर्ज अवैध ठरले आहेत.

हिंगण्यात तिघांचे अर्ज अवैध हिंगणा मतदार संघात १६ पैकी ३ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. देवेंद्र रामकृष्ण कैकाडे (बसपा) आणि नरेंद्र राजाराम मेंढे (बसपा) यांचे अर्ज तांत्रिक कारणामुळे अवैध ठरविण्यात आले. त्यांनी अर्जासोबत पक्षाचे ‘बी’ फॉर्म जोडलेले नव्हते. यासोबतच मोरेश्वर डोमाजी बागडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता.  परंतु शपथपत्रातील अपूर्ण माहिती मुळे त्यांचा अर्ज अवैध ठरला. त्यामुळे आता येथे १३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 

कामठीत तिघांचे अर्ज अवैधकामठी विधानसभेत १८ पैकी ३ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहे. यात ज्योती बावनकुळे (भाजप) आणि अनिल निधान (भाजप) यांचा समावेश आहे. या दोघांचे अर्ज तांत्रिक कारणामुळे अवैध ठरले आहेत. ज्योती बावनकुळे यांच्या अर्जासोबत पक्षाचा ‘एबी’ फार्म जोडण्यात आला नव्हता. त्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरला आहे. माझ्या पत्नीने अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरला नाही, त्याला ‘एबी’ फार्म नसल्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरेल, असे शुक्रवारीच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले होते. यासोबत अनिल निधान यांच्या एबी फॉर्मवर भाजने दुसऱ्या क्रमांकाचा पसंतीक्रम टाकल्याने त्यांचाही अर्ज अवैध ठरला आहे. या मतदार संघात भाजपने टेकचंद सावरकर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली. त्यांचा अर्ज छाननी अंती वैध ठरला आहे. 

काटोलमध्ये दोघांचे अर्ज अवैध काटोल मतदार संघात १३ पैकी दोन उमेदवारांचे अर्ज तांत्रिक कारणामुळ अवैध ठरले. यात प्रवीण बबनराव लोहे (भाजप) आणि रुपराव वामन नारनवरे (बसपा)  समावेश आहे. या दोघांनी उमेदवारी अर्जासोबत पक्षाचे अधिकृत एबी फॉर्म जोडले नव्हते. 

रामटेकमध्ये तीन अर्ज अवैध रामटेकमध्ये  तीन उमेदवारी अर्ज छाननी अंती अवैध ठरले. यात चंद्रपाल चौकसे (काँग्रेस) यांचा समावेश आहे. चौकसे यांनी उमेदवारी अर्जासोबत पक्षाचा ‘एबी’ फार्म जोडलेला नव्हता. त्यामुळे तो अवैध ठरला. चौकसे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून सादर केलेला अर्ज मात्र वैध ठरला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात ते कायम आहेत. पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रटीक) यांचा अर्जही अवैध ठरला आहे. त्यांच्या उमेदवारी अर्जात १० सूचकांच्या स्वाक्षऱ्या असणे आवश्यक होते. पण तिथे एकच स्वाक्षरी असल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरला. यासोबतच अपक्ष उमेदवार माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शरद डोणेकर यांचाही अर्ज तांत्रिक कारणामुळे अवैध ठरल्या. त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अपूर्ण माहिती असल्याने तो अवैध ठरला. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019