शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

Maharashtra Assembly Election 2019 : पाच वर्षांत झाली प्रगतीची आश्वासक सुरुवात  : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 11:16 PM

नागपूर शहरात तर ७६ हजार कोटींची विकासकामे सुरू झाली. ही प्रगतीची आश्वासक सुरुवात असून अजून तर खरा ‘चित्रपट’ बाकीच आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले.

ठळक मुद्देविकास साधताना जातीभेद नको

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : लोकशाही प्रणालीत जनतेने स्वत:च्या मताची शक्ती पाहिली आहे. मागील पाच वर्षांत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात चहुबाजूंनी विकास झाला. नागपूर शहरात तर ७६ हजार कोटींची विकासकामे सुरू झाली. ही प्रगतीची आश्वासक सुरुवात असून अजून तर खरा ‘चित्रपट’ बाकीच आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील भाजपचे उमेदवार सुधाकर देशमुख यांच्या प्रचारासाठी बोरगाव येथे आयोजित सभेदरम्यान ते बोलत होते.लोकसभेत आम्ही आमची पाच वर्षांतील कामे घेऊनच लोकांपर्यंत गेलो होतो. आता विधानसभेतदेखील कामेच बोलत आहेत. झालेला विकास सर्वांच्या समोर आहे. पश्चिम नागपूरचा मागील पाच वर्षांत मोठा विकास झाला. गोरेवाडा ‘झू’ला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला आहे. याशिवाय पश्चिम नागपुरातील संत्रा मार्केट, फुले मार्केट, कॉटन मार्केटला नवीन स्वरुप लवकरच मिळेल. रेल्वे स्थानकासमोरील उड्डाण पूल लवकरच पाडण्यात येईल. याशिवाय फुटाळा येथे आंतरराष्ट्रीय पातळीचा दर्जा असणारे ‘म्युझिकल फाऊंटन’ लवकरच अस्तित्वात येणार आहे. या सर्व गोष्टींसाठी मतदारांनी भक्कम पाठिंबा दिला. विकास करताना त्यात भेदभाव किंवा जातीभेद करु नये. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शाळा-महाविद्यालये उघडून स्वत:ची घरे भरण्यावरच भर दिला. जनतेचा विचारच केला नाही. नेत्यांच्या मुलांना तिकीट मिळू नये या मताचा मी आहे. नेत्याच्या मुलाला तिकीट द्या अशी जनतेतून मागणी झाली तरच विचार झाला पाहिजे, असेदेखील गडकरी म्हणाले. यावेळी प्रदीप पोहाणे, संदीप जाधव, जयप्रकाश गुप्ता, प्रगती पाटील इत्यादी पदाधिकारीदेखील उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nitin Gadkariनितीन गडकरीSudhakar Deshmukhसुधाकर देशमुखnagpur-west-acनागपूर पश्चिम