Maharashtra Assembly Election 2019 : बसपातर्फे सुरेश साखरे यांच्यासह १२ ही उमेदवारांनी भरले अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 00:53 IST2019-10-05T00:50:42+5:302019-10-05T00:53:19+5:30
बहुजन समाज पार्टी (बसपा)तर्फे शुक्रवारी शेवटच्या दिवशी प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांच्यांसह १२ ही उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज सादर केले. बसपाचे नेमके उमेदवार कोण याची उत्कंठा ही शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहिली.

Maharashtra Assembly Election 2019 : बसपातर्फे सुरेश साखरे यांच्यासह १२ ही उमेदवारांनी भरले अर्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बहुजन समाज पार्टी (बसपा)तर्फे शुक्रवारी शेवटच्या दिवशी प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांच्यांसह १२ ही उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज सादर केले. बसपाचे नेमके उमेदवार कोण याची उत्कंठा ही शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहिली.
बसपाच्या उमेदवारंनी यादी शेवटपर्यंत जाहीर झाली नाही. शेवटच्या केवळ प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे हे उत्तर नागपूरचे उमेदवार राहतील, इतकीच एक घोषणा एक दिवसापूर्वी झाली. परंतु उर्वरित ११ ही उमेदवारांची नावे शेवटच्या क्षणापर्यंत कुणालाही माहीत नव्हती. ती नावे उमेदवारी सादर केल्यानंतरच जाहीर झाली. शेवटच्या दिवशी सुरेश साखरे यांनी उत्तर नागपूर, पूर्व नागपूरमधून सागर लोखंडे, पश्चिम नागपूर फारुख अफजल, दक्षिण नागपूर- शंकर थूल, दक्षिण- पश्चिम नागपूर - विवेक हाडके, मध्य नागपूर -डॉ धर्मेंद्र मंडलिक, उमरेड - संदीप मेश्राम,) हिंगणा - राहुल सोनटक्के, रामटेक - संजय सत्येकार, कामठी - प्रफुल्ल माणके, सावनेर - संचयिता पाटील, काटोल - मो. शफी (सूफी बाबा) यांनी उमेदवारी अर्ज सादर केले.
तत्पूर्वी नागपूर शहरातील सहाही विधानसभा मतदार संघातील उमेदवारांचे अर्ज सादर करण्यासाठी पक्षातर्फे संविधान चौक येथे कार्यकर्त्यांनी दुपारी १२ वाजता बोलावण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सर्व उमेदवार मिळून रॅलीने उमेदवारी अर्ज सादर करायला जातील, अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. कार्यकर्ते संविधान चौकात एकत्र आले. परंतु सुरेश साखरे सोडले तर इतर मतदार संघातील उमेदवार कोण, हे कुणालाही माहीत नव्हते. काही लोकांना फॉर्म भरून तयार राहण्यास सांगण्यात आले होते. त्यांना फोन करून वेळेवर बोलावले जात होते. त्यानुसार ज्याला फोन आला त्याने आपल्या काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन फॉर्म भरले.