महामेट्रो : रिच-२ मध्ये व्हायाडक्टचे काम ५५ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 10:00 PM2019-07-23T22:00:57+5:302019-07-23T22:05:24+5:30

सीताबर्डी-हिंगणा मार्गावर (रिच-३) लवकरच मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय सीताबर्डी ते ऑटोमोटिव्ह चौकादरम्यान मेट्रो मार्गावर कामाने वेग घेतला असून ५५ टक्के काम पूर्ण झाले असून ७.२३ कि़मी.च्या या मार्गावर एकूण सात स्टेशन राहतील.

Mahametro: Viaduct work in Rich-2 at 55 percent | महामेट्रो : रिच-२ मध्ये व्हायाडक्टचे काम ५५ टक्के

महामेट्रो : रिच-२ मध्ये व्हायाडक्टचे काम ५५ टक्के

Next
ठळक मुद्दे७.२३ कि़मी. मार्गावर सात स्टेशन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सीताबर्डी-हिंगणा मार्गावर (रिच-३) लवकरच मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय सीताबर्डी ते ऑटोमोटिव्ह चौकादरम्यान मेट्रो मार्गावर कामाने वेग घेतला असून ५५ टक्के काम पूर्ण झाले असून ७.२३ कि़मी.च्या या मार्गावर एकूण सात स्टेशन राहतील.
रिच-२ मार्गावर १६४९ पाईल्सपैकी १६०६, पाईल कॅप २१९ पैकी २००, २१९ पिलरपैकी १८१, पिलर कॅप २१९ पैकी १६०, पिलर आर्म (एनएचआय लेव्हल) ३३ पैकी २९, पिलर आर्म (मेट्रो लेव्हल) ३३ पैकी २२, सेग्मेंट कास्टिंग २३१९ पैकी १२५७, स्पॅन इरेक्शन २२१ पैकी ४४ झाले असून गर्डर लॉन्चिंगचे कार्य प्रगतीपथावर आहे. या मार्गावर शासकीय कार्यालय, रिझर्व्ह बँक, खासगी व शासकीय बँक, औद्योगिक वसाहती, शासकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे रिच-२ मार्गावर वाहनचालकांची मोठी गर्दी असते. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग असल्याने जड वाहनांचे आवागमन मोठ्या प्रमाणात होते. यामुळे वाहन चालवताना होणारा त्रास आणि वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर मात करण्यासाठी येणाऱ्या काळात मेट्रो फायदेशीर ठरणार आहे. याठिकाणी वाहतुकीचे योग्य व्यवस्थापन करून मेट्रोचे कार्य पूर्ण केले जात आहे. नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
या मार्गावर गड्डीगोदाम चौक ते ऑटोमोटिव्ह चौकापर्यंत डबल डेकर उड्डाण पुलाचे निर्माण कार्य होत आहे. कार्य पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर नागरिकांना बदल पाहायला मिळणार आहे. गुरुद्वाराजवळील भारतीय रेल्वेच्या पुलावर चार मजली वाहतुकीचे स्थळ बघायला मिळणार आहेत. सर्वात खालच्या मजल्यावर रस्ता वाहतूक, पहिल्या मजल्यावर भारतीय रेल्वे, दुसऱ्या मजल्यावर (डबल डेकर) राष्ट्रीय महामार्ग व चौथ्या मजल्यावर नागपूर मेट्रोची वाहतूक होणार आहे.

Web Title: Mahametro: Viaduct work in Rich-2 at 55 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.