शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

महामेट्रो तयार करणार ‘आॅल इन वन अ‍ॅप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 01:39 IST

महामेट्रो नागपूरच्या माध्यमातून देशात पहिल्यांदाच एका अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांना मल्टी मॉडेल इंटिग्रेशन किंवा फिडर सर्व्हिसेसचा लाभ घेता येणार आहे. नागपूर शहरासाठी ही अभिमानाची बाब आहे. महामेट्रोच्या पुढाकाराने सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या शासकीय व खासगी संस्थांशी चर्चा करून ही संकल्पना प्रत्यक्षात कशी राबविता येईल, यावर विचारमंथन करण्यात येत आहे. राष्ट्रीय नागरी वाहतूक धोरणाप्रमाणे (एनयूटीपी) नागपूर शहरासाठी सर्व मेट्रो स्टेशनवरून सुविधाजनक वाहतूक व्यवस्था प्रदान करणे व पर्यावरण संवर्धन करण्याच्या दिशेने महामेट्रो कार्य करीत आहे.

ठळक मुद्दे देशातील पहिली अ‍ॅप बेस फिडर सेवा : नागरिकांना करता येणार सर्वत्र प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामेट्रोनागपूरच्या माध्यमातून देशात पहिल्यांदाच एका अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांना मल्टी मॉडेल इंटिग्रेशन किंवा फिडर सर्व्हिसेसचा लाभ घेता येणार आहे. नागपूर शहरासाठी ही अभिमानाची बाब आहे.महामेट्रोच्या पुढाकाराने सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या शासकीय व खासगी संस्थांशी चर्चा करून ही संकल्पना प्रत्यक्षात कशी राबविता येईल, यावर विचारमंथन करण्यात येत आहे. राष्ट्रीय नागरी वाहतूक धोरणाप्रमाणे (एनयूटीपी) नागपूर शहरासाठी सर्व मेट्रो स्टेशनवरून सुविधाजनक वाहतूक व्यवस्था प्रदान करणे व पर्यावरण संवर्धन करण्याच्या दिशेने महामेट्रो कार्य करीत आहे.वाहतुकीच्या सर्व घटकांची माहिती मिळणारमहामेट्रोच्या या प्रयत्नामुळे नागरिकांना केवळ एका अ‍ॅपच्या माध्यमातून मेट्रोसह सायकल, ई-रिक्षा, ई-स्कूटर, आॅटो-रिक्षा, टॅक्सी, बस व इतर सार्वजनिक वाहतूक सेवा पुरविणाºया वाहनातून प्रवास करता येणार आहे. या अ‍ॅपच्या माध्यमाने शहरातील वाहतुकीच्या विविध घटकासंबंधी महत्त्वाची माहिती सहज मिळू शकेल. तसेच यात वाहतुकीच्या या साधनांचा मार्ग, वेळापत्रक आणि नेमका प्रवास दर काय ही माहिती मिळू शकेल. जीपीएस प्रणालीच्या मदतीने जवळील वाहनांची माहिती मिळेल. कॉमन मोबिलिटी कार्डच्या साहाय्याने प्रवास भाडे चुकवणे देखील शक्य होईल.बैठकीत तज्ज्ञांचे मार्गदर्शनमेट्रो भवन येथे नुकतेच पार पडलेल्या एका बैठकीत ही संकल्पना प्रत्यक्षात कशी कार्य करेल, यावर विचारविनिमय करण्यात आला. बैठकीत महामेट्रो नागपूरचे संचालक (प्रकल्प) महेश कुमार, संचालक (वित्त) एस. शिवमाथन, (ईडी व नियोजन) सुभाष सिंगला, रामनाथ सुब्रमण्यम (पुणे मेट्रोचे ईडी व नियोजन), महेश गुप्ता (जेजीएम-एमएमआय) यांनी प्रथम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यामागचा महामेट्रोचा दृष्टिकोन व त्याची उद्दिष्टे यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच फिडर सर्व्हिसेस माध्यमातून जास्तीत ज्यास्त नागरिकांना मेट्रोशी कसा जोडता येईल यावर तज्ज्ञांनी आपले बैठकीत मांडले.बैठकीत सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यात अ‍ॅग्रिगेटर्स, आॅपरेटर्स आणि अप्लिकेशन डेव्हलपमेंट एजन्सीसह टाटा मोटर्स, अशोक लेलँड लिमिटेड, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा लिमिटेड, फोर्स मोटर्स लिमिटेड, शटल, पिनॅकल इंडस्ट्रीज, बाऊन्स (विकेट राईड अ‍ॅडव्हेंचर सर्व्हिसेस प्रा. लि.), बाजोरिया मोटर्स, मायट्रा एन ४ इलेक्ट्रिक प्रा. लि., चलो प्रा. लि., हंसा ट्रॅव्हल्स यांचा सहभाग होता.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर