शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

महामेट्रोच्या पायडल, ई-सायकल व ई-स्कूटर दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 00:03 IST

स्टेशनवरून उतरल्यानंतर सायकलने डेस्टिनेशनवर जाण्यासाठी महामेट्रोने प्रदूषणमुक्त आणि वाहतुकीला सुलभ अशा देशातील पहिल्या स्मार्ट अर्बन मोबिलिटी सोल्युशनचे उद्घाटन महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांच्या हस्ते गुरुवारी एअरपोर्ट साऊथवर स्टेशनवर करण्यात आले.

ठळक मुद्देसुलभ वाहतूक व्यवस्था : प्रवाशांना स्टेशनवरून डेस्टिनेशनवर जाण्याची सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्टेशनवरून उतरल्यानंतर सायकलने डेस्टिनेशनवर जाण्यासाठी महामेट्रोने प्रदूषणमुक्त आणि वाहतुकीला सुलभ अशा देशातील पहिल्या स्मार्ट अर्बन मोबिलिटी सोल्युशनचे उद्घाटन महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांच्या हस्ते गुरुवारी एअरपोर्ट साऊथवर स्टेशनवर करण्यात आले.स्मार्ट अर्बन मोबिलिटी सोल्युशन बाऊन्स कंपनीच्या सहकार्याने महामेट्रोने ही सेवाआणली आहे. या अंतर्गत पायडल सायकल, ई-सायकल, ई-स्कूटर दाखल केली. प्रवाशांना सायकलकरिता १० मिनिटांसाठी १ रुपया भाडे द्यावे लागेल. अ‍ॅप डाऊनलोड करून क्यूआर कोड लॉकला दाखवायचा आहे. मल्टिमॉडेल इंटिग्रेशन अंतर्गत फर्स्ट टू लास्ट माईल, नॉन मोटराईज्ड ट्रान्सपोर्ट अशी संकल्पना असून याद्वारे प्रत्येक प्रवाशाला स्टेशनवरून वाहतुकीची सुलभ यंत्रणा उपलब्ध होणार आहे. याकरिता मनपा, एनएचएआय आणि पीडब्ल्यूडीसोबत करार करण्यात येणार आहे. ई-रिक्षाने सहभाग नोंदविला आहे. मिहानमध्ये अनेक कंपन्यांनी या सुविधेची मागणी केली आहे. सायकल वा ई-स्कूटर स्टेशनवरून उतरल्यानंतर प्रवाशाला डेस्टिनेशनवर सोडायची आहे. याशिवाय प्रवाशांना स्टेशनवरून कोणत्याही वाहतुकीच्या साधनांचा उपयोग करता येणार आहे. ही यंत्रणा महामेट्रोच्या प्रत्येक स्टेशनवर राहणार आहे.मेट्रोत ‘नारी शक्ती कोच’नागपुरातील महिला संघटनांच्या मागणीनुसार महामेट्रोमध्ये असलेल्या तीन कोचपैकी एक कोच महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. ‘नारी शक्ती कोच’ असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे महिलांना दिवसरात्र सुरक्षित प्रवास करता येईल. तिकिटावर असलेल्या क्यूआर कोडच्या माध्यमातून प्रवाशांना स्टेशनवर प्रवेश करता येईल.१९ कि़मी. व आठ स्टेशनचे काम फेब्रुवारीअखेर पूर्ण होणारफेब्रुवारीअखेरीस वा मार्चच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महामेट्रोच्या नागपूर प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. या संदर्भात पत्रव्यवहार पंतप्रधान कार्यालयासोबत करण्यात आला आहे. कामाला गती देतानाच रिच-१ मध्ये खापरी ते सीताबर्डीपर्यंत १३ कि़मी. अंतर व सहा स्टेशन आणि रिच-३ मध्ये लोकमान्यनगर ते सुभाषनगरपर्यंत सहा कि़मी. अंतर व दोन स्टेशनचे काम फेब्रुवारीअखेर पूर्ण होणार आहे. रिच-१ मध्ये खापरी, न्यू एअरपोर्ट, एअरपोर्ट साऊथ, एअरपोर्ट, जयप्रकाशनगर, सीताबर्डी आणि रिच-३ मध्ये लोकमान्यनगर आणि सुभाषनगर स्टेशनचा समावेश आहे. मेट्रोच्या एकूण १९ कि़मी. मार्गावर मेट्रो व्यावसायिकरीत्या धावणार आहे. स्टेशनचे बांधकाम करणारी कंपनी आयएल अ‍ॅण्ड एफएसचे दिवाळे निघाल्यानंतर कंपनीचे काम बंद झाले. पण महामेट्रोने २५ कंत्राटदारांच्या माध्यमातून स्टेशनचे बांधकाम करण्यात येत आहे.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर