शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

‘महाकार्ड’ने मेट्रो रेल्वेचा प्रवास होणार सोपा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 00:30 IST

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट, प्रवाशांना सोपी, सोईस्कर, उपयुक्त ठरेल, याकारिता महामेट्रो सुरुवातीपासूनच प्रयत्नशील आहे. नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर सोप्या व सहज पद्धतीने करता यावा, यासाठी स्मार्ट कार्ड चलनात असणे गरजेचे आहे. यासाठी महामेट्रो नागपूरने पुढाकार घेत स्टेट बँक आॅफ इंडियाच्या सहकार्याने ‘महाकार्ड’ची सेवा नागरिकांना उपलब्ध करून देणार आहे.

ठळक मुद्देसार्वजनिक वाहतुकीसाठी वापर : नागरिकांचा फायदा

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट, प्रवाशांना सोपी, सोईस्कर, उपयुक्त ठरेल, याकारिता महामेट्रो सुरुवातीपासूनच प्रयत्नशील आहे. नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर सोप्या व सहज पद्धतीने करता यावा, यासाठी स्मार्ट कार्ड चलनात असणे गरजेचे आहे. यासाठी महामेट्रोनागपूरने पुढाकार घेत स्टेट बँक आॅफ इंडियाच्या सहकार्याने ‘महाकार्ड’ची सेवा नागरिकांना उपलब्ध करून देणार आहे.सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरण्यास नागरिकांना प्रोत्साहित करण्याकरिता महामेट्रो आणि नागपूर महानगरपालिका एकत्रित आले आहे. यांच्या संयुक्त करारानुसार एकाच कॉमन कार्डद्वारे सर्व फिडर सेवा आणि मेट्रो सेवा प्रवाशांना मिळणार आहे. गेल्या वर्षी ३० सप्टेंबर रोजी महामेट्रोच्या ट्रायल रनसंबंधी झालेल्या जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि स्टेट बँक आॅफ इंडियाचे तत्कालीन अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांच्या उपस्थितीत या कार्डाचे लोकार्पण करण्यात आले होते. आता हे कार्ड सर्वसामान्य नागरिकांकरिता उपलब्ध होणार आहे.कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच महाकार्ड ही एक अभिनव संकल्पना आहे. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड स्पेसिफिकेशनच्या आधारावर हे कार्ड तयार करण्यात आले. ईएमव्ही (युरोपे, मास्टर, व्हिसा) पद्धतीवर आधारित आहे. नागरिकांना याद्वारे कुठेही सहजपणे, न थांबता प्रवास करता येणार आहे. घरापासून ते मेट्रो स्टेशन आणि परत मेट्रो स्टेशन ते आॅफिसपर्यंत उपयोगात येणाऱ्या सर्व सार्वजनिक वाहतुकीसाठी या कार्डचा वापर होईल. जसे आॅटो, मोबाईल, बस आणि मेट्रो याठिकाणी कार्ड स्वाईप करून प्रवासी दर चुकविता येईल. यासाठी प्रत्येक वेळी पैशांची गरज पडणार नाही. इतकेच नव्हे तर रोजच्या जीवनोपयोगी वस्तूदेखील नागरिकांना ‘महाकार्ड’ने खरेदी करता येईल. तसेच शॉपिंग मॉल, सिनेमागृह, उपाहारगृह अशा विविध ठिकाणीदेखील हे कार्ड वापरता येणार आहे.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर