‘महाबीज’ला आर्थिक स्वायत्तता देण्याची गरज!
By Admin | Updated: August 9, 2014 02:04 IST2014-08-09T02:04:03+5:302014-08-09T02:04:21+5:30
जे.पी.डांगे यांचे मत: महाबीजच्या कामाचा घेतला आढावा

‘महाबीज’ला आर्थिक स्वायत्तता देण्याची गरज!
अकोला: महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाला (महाबीज) आर्थिक आणि आस्थापनाविषयक स्वायत्तता देण्याची गरज आहे, असे मत राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष जे.पी. डांगे यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले.
अकोल्यातील महाबीजच्या कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. महाबीजमध्ये कार्यरत मनुष्यबळ कमी असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. महाबीजची वार्षिक उलाढाल आणि कामाची व्याप्ती लक्षात घेता, महाबीजला आर्थिक आणि आस्थापनाविषयक अधिक स्वायत्तता देण्यास हरकत नसल्याचे डांगे यांनी सांगितले. वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी यावेळी महाबीजच्या कामाचा आढावा घेतला. त्यामध्ये महाबीजची वार्षिक उलाढाल, बियाणे निर्मिती, विक्रीबाबतच्या माहितीसह राज्यात महाबीजचे २३ प्रक्रिया केंद्र कार्यरत असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. याशिवाय राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत मिळणारी मदत आणि बीटी कपाशीसह विविध नवीन प्रकल्पांची माहिती महाबीजच्यावतीने डांगे यांना देण्यात आली. महाबीजच्या कार्याबद्दल त्यांनी समाधानही यावेळी व्यक्त केले. या आढावा बैठकीला महाबीजचे महाव्यवस्थापक (प्रक्रिया व अभियांत्रिकी) विनोद काळपांडे,महाव्यवस्थापक (विपणन) राजेंद्र नाके, महाव्यवस्थापक (वित्त) संजय ठकराल, महाव्यवस्थापक (प्रशासन) आर.डी.काळे, विभागीय व्यवस्थापक (नियंत्रण व संशोधन) उमाकांत गावंडे, उपमहाव्यवस्थापक (प्रक्रिया) अनिल चोपडे, पुष्कर देशपांडे व इतर अधिकारी उपस्थित होते.
*महाबीजची ५५0 कोटींची उलाढाल!
४ २0१३-१४ या वर्षात खरीप व रब्बी हंगामात सोयाबीन, गहू, हरभरा व उडीद, धान इत्यादी बियाणे विक्रीतून महाबीजची वार्षिक उलाढाल ६0 कोटींची झाली आहे. ११ लाख क्विंटल बियाणे विक्रीतून ही उलाढाल झाली असून, त्यामधून महाबीजला जवळपास ६0 कोटींचा नफा झाल्याची माहिती राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांना यावेळी महाबीजच्या अधिकार्यांनी दिली.