‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ नागपुरात लवकरच होणार; सुभाष देसाई यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2022 09:03 PM2022-04-16T21:03:04+5:302022-04-16T21:03:36+5:30

Nagpur News विदर्भाचा औद्योगिक विकास आणि नवीन उद्योग येण्यासाठी राज्य सरकार लवकरच ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ हा गुंतवणुकीचा इव्हेंट नागपुरात घेणार आहे, अशी घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी येथे केली.

‘Magnetic Maharashtra’ to be held in Nagpur soon; Announcement by Subhash Desai | ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ नागपुरात लवकरच होणार; सुभाष देसाई यांची घोषणा

‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ नागपुरात लवकरच होणार; सुभाष देसाई यांची घोषणा

Next
ठळक मुद्देव्हीआयए सोलर विदर्भ उद्योग गौरव पुरस्काराचे वितरण

नागपूर : राज्य शासनाने विदर्भातील उद्योगांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले असून, प्रत्येकाला उद्योग सुरू करण्यासाठी आवाहन केले जात आहे. उद्योगाचा विकास होईपर्यंत सरकार पाठपुरावा करेल. विदर्भाचा औद्योगिक विकास आणि नवीन उद्योग येण्यासाठी राज्य सरकार लवकरच ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ हा गुंतवणुकीचा इव्हेंट नागपुरात घेणार आहे, अशी घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी येथे केली.

विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचा (व्हीआयए) ५८ वा स्थापना दिवस आणि चौथा व्हीआयए सोलर विदर्भ उद्योग गौरव पुरस्काराचे वितरण हॉटेल सेंटर पाॅईंटमध्ये शनिवारी आयोजित भव्य समारंभात करण्यात आले. मंचावर व्हीआयएचे अध्यक्ष सुरेश राठी, ज्युरी सदस्य माजी न्यायमूर्ती आर. के. देशपांडे, सोलर इंडस्ट्रीज इंडिया लि.,चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष नुवाल, डालमिया सिमेंट (इं.) लि.,चे कार्यकारी संचालक हकीमुद्दीन अली, आर. सी. प्लास्टो टँक्स ॲण्ड पाईप्सचे संचालक विशाल अग्रवाल उपस्थित होते. याशिवाय नऊ वर्गवारीत विदर्भातील उद्योजकांना पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्काराचे वितरण सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.

सुभाष देसाई म्हणाले, विदर्भातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी व्हीआयएने हा चांगला उपक्रम सुरू केला आहे. त्याकरिता सर्व स्तरातील उद्योगांना प्रोत्साहन मिळत आहे. तसे पाहता, पुरस्कारासाठी निवड होणे, हे एक आव्हानच असते. पुरस्कारप्राप्त उद्योजकांचे अभिनंदन आहे. लघु उद्योजकांनी पाठपुरावा करून आपल्या संकल्पना प्रत्यक्षात आणाव्यात. राज्य सरकारला अशा उद्योजकांना मदत करण्यास सदैव तयार आहे. स्पर्धेच्या युगात महिला उद्योजिकांनी ठसा उमटविणे हे आव्हानात्मक काम आहे. शासनाने महिला उद्योजिकांसाठी अनेक योजना आणल्या असून, त्याचा फायदा घ्यावा. युवकांनीही उद्योग स्थापनेसाठी पुढे यावे, असे आवाहन देसाई यांनी केले.

प्रारंभी मनीष नुवाल, हकीउद्दीन अली, विशाल अग्रवाल यांनी युवकांना उद्योग सुरू करण्याचे आवाहन केले. उद्योग सुरू करण्यासाठी आणि वाढविण्यासाठी येणाऱ्या अडचणी आणि समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करावा.

कार्यक्रमात बीआयएचे अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल, एमआयएचे अध्यक्ष चंद्रशेखर शेगावकर, कोसिया विदर्भाचे अध्यक्ष सीए जुल्फेश शाह, टाटा स्टीलचे मधुकर ठाकूर, व्हीआयएचे माजी अध्यक्ष अतुल पांडे, कार्यकारिणीचे पदाधिकारी, सदस्य, व्हीआयए महिला विंगच्या पदाधिकारी, विदर्भातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: ‘Magnetic Maharashtra’ to be held in Nagpur soon; Announcement by Subhash Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.