डान्सिंग, सिंगिंग, मॉडेलिंगची जादू आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:11 IST2021-01-03T04:11:47+5:302021-01-03T04:11:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नव्या वर्षात नव्या प्रतिभांना भरारी देण्यासाठी लोकमत कॅम्पस क्लब, फेम ॲण्ड ग्लोरी इव्हेंट्स प्रा. ...

डान्सिंग, सिंगिंग, मॉडेलिंगची जादू आज
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नव्या वर्षात नव्या प्रतिभांना भरारी देण्यासाठी लोकमत कॅम्पस क्लब, फेम ॲण्ड ग्लोरी इव्हेंट्स प्रा. लि. आणि सेंट्रल प्रोव्हिन्शियल स्कूलच्या वतीने ‘शहजादे हुनर के’च्या मेगा ऑडिशनचे आयोजन नि:शुल्क करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे कॉस्ट्युम पार्टनर आर्टिस्टिका आहेत. कार्यक्रमात लहान मुले व तरुण डान्सिंग, सिंगिंग आणि मॉडेलिंगच्या स्पर्धेचे आयोजन होईल. ३ ते २५ वर्ष वयोगटातील मुले-मुली यात सहभागी होऊ शकतील. ३ जानेवारीला सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजतापर्यंत हे आयोजन असेल. बेसा येथील वेळाहरी आऊटर रिंगरोड स्थित सेंट्रल प्रोव्हिन्शियल स्कूलमध्ये हे आयोजन होईल. अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक ९८०७७२२२५५, ९३७३२३१४८९ किंवा ९८२२४०६५६२ वर संपर्क साधता येईल.
टीव्ही प्रोमो जाहिरात शुटिंगची मिळेल संधी
निवडलेल्या कलाकारांना टीव्ही प्रोमो जाहिरात शुटिंगसाठी संधी मिळेल. १० जानेवारी २०२१ पासून ट्रेनिंग आणि ग्रुमिंगची सुरुवात होईल. फेम ॲण्ड ग्लोरी इव्हेंट्स प्रा. लि.चे कमलेश क्षीरसागर व श्रुती काळे यांच्या मार्गदर्शनात सुपरगुरू ललिता सोनी डान्स, पायल पोकरन मॉडेलिंग आणि अबोली गिऱ्हे सिंगिंगचे प्रशिक्षण देतील. १७ जानेवारी २०२१ ला शुटिंग केली जाईल.