शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मध्यप्रदेशच्या सराईत वाहनचोरास अटक, चार दुचाक्या जप्त

By योगेश पांडे | Updated: July 1, 2023 17:29 IST

सिताबर्डी पोलीस पथकाची कारवाई

नागपूर : विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून दुचाक्या चोरणाऱ्या सराईत वाहनचोराला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अल्केश उईके (२५, बैतूल, मध्यप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.

२७ जून रोजी रामदासपेठेतून प्रवीण चौबे यांची दुचाकी चोरी गेली होती. त्यांच्या तक्रारीवरून सिताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. तपासादरम्यान खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून अल्केशवर पोलिसांना संशय गेला. त्याला मिठानीम दर्ग्याजवळून सापळा रचून पकडण्यात आले. त्याने अगोदर उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र नंतर गुन्ह्याची कबुली दिली.

रामदासपेठसोबतच त्याने अमरावती जिल्ह्यातील वरूड, वाठोडा पोलीस ठाणे, कळमेश्वर येथूनदेखील दुचाकी चोरल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चार दुचाक्या जप्त केल्या. त्याला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल सबनीस, विश्वनाथ चव्हाण, संतोष कदम, विनोद तिवारी, कैलास मगर, धीरज देशमुख, गणेश रंभापुरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरbikeबाईकtheftचोरीArrestअटक