मध्यप्रदेशात भाजपची पिछेहाट, तर काँग्रेसचे जोरदार कमबॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 02:54 PM2018-12-11T14:54:04+5:302018-12-11T14:54:34+5:30

मध्य प्रदेशात भाजपाला ‘अ‍ॅन्टीइन्कम्बन्सी’ चा चांगलाच फटका बसत आहे. पदाधिकाऱ्यांची नाराजी, बंडखोरांनी पक्षविरोधी केलेल्या कारवायांमुळे भाजपची पिछेहाट झाल्याचे चित्र आहे.

In Madhya Pradesh, BJP's backwardness, and Congress's strong backing | मध्यप्रदेशात भाजपची पिछेहाट, तर काँग्रेसचे जोरदार कमबॅक

मध्यप्रदेशात भाजपची पिछेहाट, तर काँग्रेसचे जोरदार कमबॅक

Next

गजानन चोपडे
लोकमत न्यूज नेटवर्क
भोपाळ : मध्य प्रदेशात भाजपाला ‘अ‍ॅन्टीइन्कम्बन्सी’ चा चांगलाच फटका बसत आहे. पदाधिकाऱ्यांची नाराजी, बंडखोरांनी पक्षविरोधी केलेल्या कारवायांमुळे भाजपची पिछेहाट झाल्याचे चित्र आहे. मतगणनेची प्रक्रिया सुरू असून सध्या भाजपने ११० जागांवर आघाडी घेतली आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत तब्बल ५५ जागांचे नुकसान भाजपला होत आहे. तर काँग्रेसने १०९ जागांवर आघाडी घेत जोरदार कमबॅक केले आहे. विशेष म्हणजे ही निवडणूक भाजपाला महागात पडू शकते, असा सल्ला खुद्द मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांचे राजकीय गुरू आणि ज्येष्ठ संघ प्रचारक सूर्यकांत केळकर यांनी यापूर्वीच दिले होते. आजच्या निकालानंतर त्यावर शिक्कामोर्तब होताना दिसत आहे.
व्यापंम घोटाळ्यामुळे मध्य प्रदेश सरकारवर काँग्रेसने आधीच टीकेची झोड उठवली होती. शेतकऱ्यांच्या आंदोलनात झालेला गोळीबार त्यात ठार झालेले सहा शेतकरी, हेदेखील भाजपच्या ढासळत्या जनाधाराचे मुख्य कारण मानले जात आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांचे मेव्हणे संजय मसानी यांनी भाजपला रामराम ठोकत कॉग्रेस प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांसाठी हा पहिला मोठा धक्का होता. याशिवाय अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी केलेली बंडखोरी भाजपला भोवली. पक्षाकडून त्यांच्या मनधरणीचा प्रयत्न झाला असला तरी नाराजीचा सूर कायम होता, हेच या निकालावरून स्पष्ट होत आहे. भाजपला बहुमताचा आकडा गाठता येईल? किंवा नाही, याबाबत खुद्द भाजप नेत्यांमध्येच साशंकता आहे. त्यामुळे कुठलाही मोठा नेता आतापर्यंत माध्यमांपुढे आला नाही. शिवाय ‘मीच सर्वात मोठा सर्वेयर’ असे म्हणणारे मुख्यमंत्रीही निकाल बघून अवाक् झाले आहेत. तिकडे गेली १५ वर्षे गटबाजीमुळे मध्यप्रदेशात तळाला आलेल्या काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे. कमलनाथ, ज्योतिरादित्य सिंधिया आणि दिग्विजय सिंह यांची एकजूट काँग्रेसला लाभकारी ठरली. भाजपला अपेक्षित मतांचे विभाजनही झालेले दिसत नाहीे.

 

 

 

Web Title: In Madhya Pradesh, BJP's backwardness, and Congress's strong backing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.