शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
2
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
3
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
4
मिचेल स्टार्कचा भेदक मारा, राहुल त्रिपाठी लढला! KKR समोर SRH २० षटकंही नाही टिकला
5
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
6
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
7
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
8
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
9
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
10
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
11
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
12
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
13
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
14
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

४८ हजार मताधिक्याने मधुकर कुकडे विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 9:33 PM

भंडारा - गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल गुरुवारी (दि.३१) जाहीर झाला. यात काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं, पीरिपाचे अधिकृत उमेदवार मधुकर कुकडे यांना एकुण ४ लाख ४२ हजार २१३ मते मते मिळाली. भाजपचे उमेदवार हेमंत पटले यांना ३ लाख ९४ हजार ११६ तर भारिपचे उमेदवार अ‍ॅड.एल.के. मडावी यांना ४० हजार ३२६ मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कुकडे यांना ४८ हजार ९७ मतांनी विजयी घोषित केले.

ठळक मुद्देभंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक : भाजपने गमावली जागा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा - गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल गुरुवारी (दि.३१) जाहीर झाला. यात काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं, पीरिपाचे अधिकृत उमेदवार मधुकर कुकडे यांना एकुण ४ लाख ४२ हजार २१३ मते मते मिळाली. भाजपचे उमेदवार हेमंत पटले यांना ३ लाख ९४ हजार ११६ तर भारिपचे उमेदवार अ‍ॅड.एल.के. मडावी यांना ४० हजार ३२६ मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कुकडे यांना ४८ हजार ९७ मतांनी विजयी घोषित केले. कुकडे यांच्या विजयाची घोषणा होताच पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर गुलाल उधळून व फटाके फोडून विजयी जल्लोष साजरा केला.येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनात गुरूवारी सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला पोस्टल बॅलेटची मते मोजण्यात आली. त्यानंतर मतमोजणीला सुरुवात झाली. निकाल ऐकण्यासाठी मतमोजणी केंद्र परिसरात पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मतमोजणीच्या एकूण ३४ फेºया होणार होत्या. पहिल्या फेरीपासूनच कुकडे यांनी आघाडी घेतली ती ३४ व्या फेरीपर्यंत कायम होती. कुकडे यांच्या विजयाची घोषणा होताच काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं, पीरिपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर विजयी जल्लोष साजरा केला. या विजयामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व रिपाइं, पीरिपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर कुकडे यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. खासदार प्रफुल्ल पटेल, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, माजी राज्य मंत्री नाना पंचबुद्धे, माजी आमदार सेवक वाघाये, माजी आमदार आनंदराव वंजारी, अनिल बावनकर आदींनी मधुकर कुकडे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. त्यानंतर भंडाऱ्यात विजयी रॅली काढण्यात आली. यात मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.उमेदवारनिहाय मिळालेली मतेमधुकर कुकडे काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं, पीरिपा - ४ लाख ४२ हजार २१३हेमंत पटले भाजप - ३ लाख ९४ हजार ११६एन.के. मडावी भारिप - ४० हजार ३२६(मधुकर कुकडे ४८ हजार ९७ मताधिक्याने विजयी झाले)

टॅग्स :Bhandara-Gondia Lok Sabha Bypoll 2018भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक 2018NCPराष्ट्रवादी काँग्रेस