शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

सावनेर तालुक्याची मदार प्रभारींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:10 IST

बाबा टेकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : काेराेना संक्रमणामुळे महसूल व आराेग्य विभागासह स्थानिक नगर परिषदेतील अधिकाऱ्यांच्या कामे व ...

बाबा टेकाडे

लाेकमत न्यूज नेटवर्क

सावनेर : काेराेना संक्रमणामुळे महसूल व आराेग्य विभागासह स्थानिक नगर परिषदेतील अधिकाऱ्यांच्या कामे व जबाबदारीत वाढ झाली आहे. सावनेर तालुक्यात या तिन्हीसह इतर विभागातील अधिकाऱ्यांना तीन वेगवेगळी कार्यालये व विभागाची एकाच वेळी जबाबदारी पार पाडावी लागत असल्याने यात एकीकडे त्यांची फरफट हाेत असून, दुसरीकडे सामान्य नागरिकांना त्यांच्या समस्या वेळीच साेडविल्या जात नसल्याने विविध अडचणींना सामाेरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे, ही सर्व कार्यालये व अधिकारी महत्त्वाचे आहेत.

तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार चैताली दराडे यांच्याकडे तहसीलदारांचा प्रभार असून, अन्य दाेन विभागाचा कार्यभार आहे. सतीश मासाळ, विनाेद मेश्राम व संगीता बाेडखे या तिन्ही नायब तहसीलदारांची बदली करण्यात आली असून, सतीश मासाळ जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. संगीता बाेडखे यांच्याकडे संजय गांधी निराधार याेजनेचा कार्यभार हाेता. या तिघांच्याही जागी नवीन नायब तहसीलदारांची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे परीविक्षाधीन नायब तहसीलदार गजानन जवादे हे एकमेव चैताली दराडे यांच्या दिमतीला आहेत. तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांना काेराेनाची लागण झाल्याने कामाचा ताण आणखी वाढला आहे.

सावनेर तालुक्यासह शहरात काेराेना संक्रमण वाढत आहे. तहसील कार्यालयासाेबतच स्थानिक नगर परिषद कार्यालय मुख्याधिकाऱ्यांच्या बाबतीत प्रभारींवरच अवलंबून आहे. प्रभारी मुख्याधिकारी स्मिता काळे या आठवड्यातील मंगळवार व शनिवार हे दाेन दिवस सावनेर तर बुधवार व साेमवार माेहपा तर गुरुवार व शुक्रवार कळमेश्वर नगर परिषद कार्यालयात सेवा देतात. विशेष म्हणजे, दाेन्ही तालुक्यांमध्ये व तिन्ही शहरात काेराेना संक्रमित रुग्ण आहेत. मुख्याधिकाऱ्यांअभावी पालिका कर्मचाऱ्यांना काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांची अंमलबजावणी करताना अडचणींना ताेंड द्यावे लागते.

पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या महिला व बालकल्याण विभागात एकमेव कारकून कार्यरत असून, चार पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील उपविभागीय अधिकारी शेंडे यांची उमरेडला बदली करण्यात आल्याने, त्यांचा प्रभार जिल्हा परिषदेतील शाखा अभियंता केशव हलगुले यांच्याकडे साेपविला हाेता. ते सेवानिवृत्त झाल्याने हा प्रभार सुरुवातीला जिल्हा परिषदेतील शाखा अभियंता प्रकाश जाधव यांच्याकडे व नंतर मिलिंद देशपांडे यांच्याकडे दिला आहे.

पाटबंधारे उपविभागातील उपविभागीय अभियंता नरेंद्र निमजे यांच्याकडे यांत्रिकी विभाग अजनी नागपूर व पेंच प्रकल्पाचा अतिरिक्त कार्यभाग सोपविला आहे. या कार्यालयांतर्गत सावनेर, कळमेश्वर व पारशिवनी या तीन तालुक्यांसह अन्य दोन कार्यालयांचा समावेश केला आहे. पंचायत समितीतील महिला व बालविकास अधिकारी दामोधर कुमरे यांच्याकडे कळमेश्वर व काटोल या दाेन कार्यालयांचा प्रभार आहे. त्यामुळे त्यांचीही अवस्था इतर विभागातील अधिकाऱ्यांसारखीच आहे.

...

तहसील कार्यालय

सावनेर तालुक्याचा व्याप बराच माेठा आहे. तहसीलदार दीपक कारंडे यांच्या बदलीनंतर प्रताप वाघमारे यांनी तहसीलदारपदाची सूत्रे स्वीकारली. ‘मॅट’ने दीपक कारंडे यांच्या बाजूने निर्णय दिल्याने व नंतर कारंडे यांना तांत्रिक कारणांमुळे सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याने नायब तहसीलदार चैताली दराडे यांच्याकडे प्रभार साेपविण्यात आला. त्यांच्याकडे आधीच निवडणूक व संजय गांधी निराधार याेजनेचा कार्यभार आहे.

....

नगर परिषद

सावनेर ही जुन्या नगरपालिकांपैकी एक असून, पालिकेचे वार्षिक उत्पन्न ३५ काेटी रुपये आहे. औद्याेगिक वसाहत व राष्ट्रीय महामार्गामुळे पालिकेच्या हद्दीतील आर्थिक उलाढालही माेठी आहे, शिवाय लाेकसंख्याही ४० हजारापेक्षा अधिक आहे. या नगर परिषदेचा कार्यभारही प्रभारी मुख्याधिकाऱ्यांच्या भरवशावर आहे. तत्कालीन मुख्याधिकारी रवींद्र भेलावे यांना पदाेन्न्ती मिळाल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांचा प्रभार कळमेश्वर पालिकेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे यांच्याकडे साेपविण्यात आला. स्मिता काळे यांच्याकडे सावनेरसाेबतच माेहपा नगरपालिकेचाही प्रभार आहे. त्यामुळे त्यांनाही तीन वेगवेगळी कार्यालये सांभाळावी लागतात.

...

आराेग्य विभाग

तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. राेहन झाडे यांची वर्षभरापूर्वी सिंदेवाही (जिल्हा चंद्रपूर) येथील ग्रामीण रुग्णालयात बदली करण्यात आली. त्यांच्या जागी पूर्णवेळ तालुका आराेग्य अधिकारी नियुक्त करण्याऐवजी पारशिवनीचे तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. प्रशांत वाघ यांच्याकडे प्रभार साेपविण्यात आला. त्यांनाही दाेन तालुक्यातील कामे एकाचवेळी सांभाळावी लागत असल्याने त्यांची दमछाक हाेत आहे. सावनेर शहरातील शासकीय रुग्णालयाची भिस्त एका वैद्यकीय अधिकाऱ्यावर आहे. येथील ग्रामीण आरोग्य व प्रशिक्षण केंद्रातील चारपैकी दाेन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. एक वैद्यकीय अधिकारी काेविड सेंटरमध्ये व्यस्त असून, दुसऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला संपूर्ण रुग्णालयाचा कार्यभार बघावा लागतो. त्यांच्या मदतीला दाेन प्रशिक्षणार्थी आहेत.