शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

कोरोनाच्या १३४ रुग्णांना ‘लंग फायब्रोसिस’; १३.७२ टक्के रुग्ण हे ‘हेल्थ केअर वर्कर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 13:19 IST

Nagpur News सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ‘पल्मनरी मेडिसीनच्या पोस्ट कोविड’ विभागात मागील पाच महिन्यांत १३२८ रुग्ण उपचारांसाठी आले. यातील १० टक्के म्हणजे, १३४ रुग्णांना ‘पल्मनरी (लंग) फायब्रोसीस’चे निदान झाले.

ठळक मुद्देहेल्थ केअर वर्करमध्ये फायब्रोसिसचे प्रमाण १४ टक्केमेडिकलच्या पोस्ट कोविडमध्ये १३२८ रुग्ण

सुमेध वाघमारे

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या उपचारांचा कालावधी पूर्ण करून घरी गेलेल्या काही रुग्णांमध्ये फुप्फुसाचा आजार बळावत असल्याचे दिसून येत आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ‘पल्मनरी मेडिसीनच्या पोस्ट कोविड’ विभागात मागील पाच महिन्यांत १३२८ रुग्ण उपचारांसाठी आले. यातील १० टक्के म्हणजे, १३४ रुग्णांना ‘पल्मनरी (लंग) फायब्रोसीस’चे निदान झाले. धक्कादायक म्हणजे, यातील १३.७२ टक्के, २८ रुग्ण हे ‘हेल्थ केअर वर्कर’ आहेत.

कोरोनाचा दुसऱ्या लाटेमुळे गंभीर स्थिती निर्माण झाली होती. परंतु, जून महिन्यापासून रुग्ण व मृत्यूच्या संख्येत मोठी घट आल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला. मात्र, आता कोरोनातून बरे झालेल्या काही रुग्णांमध्ये विविध आजारांची लक्षणे दिसून येऊ लागल्याने चिंता वाढली आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा ‘पल्मनरी मेडिसीन’ विभागातील ‘पोस्ट कोविड ओपीडी’ फेब्रुवारी महिन्यात १३४, मार्च महिन्यात ११५, एप्रिल महिन्यात २०४, मे महिन्यात सर्वाधिक ७३३, जून महिन्यात १०४, तर ६ जुलैपर्यंत ३८ असे एकूण १३२८ रुग्णांची नोंद झाली. फुप्फुसामध्ये सर्वात घातक आजार असलेला ‘पल्मनरी फायब्रोसीस’चे १३४ रुग्ण दिसून आल्याने वैद्यकीय क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, यात ४० वर्षांवरील रुग्णांची संख्या अधिक आहे.

-पहिल्या लाटेत ‘फायब्रोसिस’चे १६ टक्के रुग्ण

कोरोनाचा पहिल्या लाटेतील सप्टेंबर ते डिसेंबर २०२० या कालावधीत ‘पोस्ट कोविड ओपीडी’मध्ये ४३९ रुग्ण उपचारांसाठी आले. यात २४३ पुरुष, तर १९६ महिलांचा समावेश होता. यातील १६.६२ टक्के म्हणजे, ७३ रुग्णांना ‘पल्मनरी फायब्रोसिस’ होते.

- ‘फायब्रोसिस’ धोकादायक!

मेडिकलच्या पल्मनरी विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम म्हणाले, फुप्फुसाच्या त्रासाला वैद्यकीय भाषेत ‘लंग इन्फेक्शन फायब्रोसिस’ म्हणतात. यात कोरोनाची लागण झाल्यावर फुप्फुसात संसर्ग होतो. उपचारांनंतर या संसर्गाचे व्रण राहतात. यामुळे फुप्फुसाची कार्यक्षमता कमी होते. रुग्णाला धाप लागते. तीव्र स्वरुपाच्या लंग फायब्रोसिसचा प्रभाव हृदयावर पडतो. हृदय कमजोर होऊ शकते. रुग्णाची स्थिती चिंताजनक झाल्यास फुप्फुस तर काही प्रकरणांमध्ये फुप्फुस व हृदय दोन्ही अवयव प्रत्यारोपण करण्याची गरज पडते.

- कोरोनानंतर फुप्फुसांची तपासणी आवश्यक 

‘पल्मनरी फायब्रोसिस’चे अनेक टप्पे आणि प्रकार आहेत. या आजाराच्या प्रादुर्भावामुळे जीवनाची गुणवत्ता आणि कालावधीवर थेट परिणाम होतो. यामुळे कोरोनाचे प्रतिबंधक नियम पाळून आजारालाच दूर ठेवणेच हाच एक पर्याय आहे. कोरोनानंतर फुप्फुसांची तपासणी करून घेणे, लक्षणांवर लक्ष ठेवणे व उपचार करणे अतिशय आवश्यक आहे.

-डॉ. सुशांत मेश्राम, विभागप्रमुख, पल्मनरी मेडिसीन, मेडिकल

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस